शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीमधील डिजिटल सेवांचा उपक्रम खोळंबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:11 IST

एक वर्ष उलटले तरी जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीत ही सेवा सुरु होवू शकली नसल्याचे दिसून येते.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाच्या ई -ग्रामपंचायत प्रकल्पाद्वारे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आॅक्टोबर २०१८ पर्यंत सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा देण्यात येणार होती. मात्र अद्याप एक वर्ष उलटले तरी जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीत ही सेवा सुरु होवू शकली नसल्याचे दिसून येते.बिएसएनएलच्या मदतीने ग्रामपंचायतस्तरावर आॅप्टीकल फायबर टाकण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रयत्न सुरु केले होते. मात्र बिएसएनएलकडून प्रतिसाद मिळू न शकल्याने अनेक ग्रामपंचायतीत केबल पोहचू शकली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले आहे. त्याअंतर्गत देशातील सर्व ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराजन यांनी त्यादृष्टीने जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींचा आढावा घेवून इंटरनेट सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सुचना दिल्या. ग्रामसेवकांनीही यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. ग्रामपंचायतमध्ये मानधनतत्वावर डाटा एन्ट्री आॅपरेटर सुद्धा नेमलेत. अनेक ग्रामपंचायतीमध्ये डाटा एन्ट्री आॅपरेटर फुकटचे मानधन घेत असल्याचे दिसून येते. या सेवेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयातमिनी एटीएम सेवा, • कॅशडीपॉजिट, कॅशविड्रॉल, वीजबिल ,फोनबिल,रिचार्ज, एस एम एस ,ई- मेल ,व्हाईस कॉल, आॅनलाईन करभरणा आदी सेवा पुरवल्या जाणार होत्या. याशिवाय गावाच्या विकास कामांची माहिती, शासकीय योजणांची माहिती, गावाची यशोगाथा आदी माहिती या माध्यमातून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करायची होती. मात्र सुविधाच नसल्याने समस्या आहे.ग्रामसेवक आग्रही!ग्रामपंचायतीमार्फत डिजीटल सेवा देण्यासाठी अनेक गावामध्ये ग्रामसेवकांनी संगणक खरेदी केले आहे. मात्र इंटरनेटचीच सुविधा नसल्याने ते हतबल झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देवून इंटरनेटचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायत