शासकीय गोदामाची दुरवस्था

By Admin | Updated: June 7, 2014 23:45 IST2014-06-07T23:17:10+5:302014-06-07T23:45:46+5:30

राशनचे धान्य साठविण्यासाठी आरेगाव रोडवर असलेल्या शासकीय धान्य गोदामाची दुरवस्था झाली आहे.

Government godown disturbance | शासकीय गोदामाची दुरवस्था

शासकीय गोदामाची दुरवस्था

डोणगाव : राशनचे धान्य साठविण्यासाठी आरेगाव रोडवर असलेल्या शासकीय धान्य गोदामाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे धान्याची नासाडी होत आहे. स्थानिक आरेगाव रोडवरील शासकीय धान्य गोदामाला मोठमोठे छिद्र पडले असून, भिंतींनाही तडा गेला आहे. धान्य गोदामाच्या भिंतीमधून कीटक, धूळ, पाणी जात असल्याने गोदामातील धान्य खराब होत आहे. याच धान्य गोदामात खराब झालेले २४ क्विंटल धान्य बदलण्यासाठी २८ मार्च २0१४ रोजी साठा व्यवस्थापक वखार मंडळाकडे पाठविण्यात आले आहे. ते धान्य अद्याप बदलून मिळाले नाही. सदर धान्य गोदामाची पाहणी तहसीलदार निर्भय जैन यांनी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला धान्य गोदामाचे अंदाजपत्रक तयार करून अहवाल सादर करावा, असे पत्रही देण्यात आले होते; परंतु त्यावरही अद्यापपर्यंत शासनाकडून कार्यवाही नाही. उलट कृउबास उपपेठ डोणगावचे गोडावून शासनाने भाड्याने घेतले होते. त्याचेही भाडे अद्यापपर्यंत थकीत आहे. त्यामुळे सदर धान्य गोदामाचे बांधकाम त्वरित करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)

Web Title: Government godown disturbance