Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद

पावसाच्या बॅटिंगनंतर कोहलीनं केली विक्रमांची 'बरसात'

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या रायपूरच्या मैदानात पावसाच्या बॅटिंगनंतर किंग कोहलीनं धावांचा पाऊस पाडत एका डावात अनेक नवे विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले.

IPL मध्ये सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीनं कोलकाताने दिलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना १०५ धावांची नाबाद खेळी करत खास विक्रमांना गवसणी घातली.

टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक १० शतके झळकवणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

टी-२० मध्ये १४ हजार धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय देखील ठरला आहे ठरला.

किंग कोहलीनं फक्त ४०९ डावात १४ हजार धावा पूर्ण करत ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडीत काढला. सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे.

IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सर्वाधिक ९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रमही आता कोहलीच्या नावे झाला आहे.

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच विराट कोहलीनं MS धोनीचा सर्वाधिक IPL मॅचेस खेळण्याचा महारेकॉर्डही मोडीत काढला.

नाबाद शतकी खेळीसह विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. IPL मध्ये २१ व्या वेळी हा पुरस्कार जिंकत त्याने रोहित शर्माची बरोबरी केली आहे.