शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जनरल स्टोअर्स, शीतपेयाची दुकाने झाली दूध, भाजीपाला विक्री केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 11:56 IST

Buldhana News: कारवाईपासून वाचण्यासाठी दुकानदारांनी ही अनोखी शक्कल लढविली आहे.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केवळ अत्यावश्यक सेवांना सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र, यातही काही दुकानदारांनी निर्बंधाच्या काळातही आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी दुकानाच्या पाट्याच बदलविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी दुकानदारांनी ही अनोखी शक्कल लढविली आहे. त्यामुळे जनरल स्टोअर्स, शीतपेयाची दुकाने आता दूध आणि भाजीपाला विक्री केंद्रे बनली आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांनाही सकाळी सात ते ११ वाजेपर्यंतच मुभा देण्यात आलेली आहे. यामध्ये दूध विक्रेत्यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लाऊन धरली होती. त्यामुळे दूध हे नाशवंत असल्याने त्यांच्या मागणीचा विचार करून होणारे नुकसान टाळण्यासाठी दूध विक्रेत्यांना सकाळ व सायंकाळी दोन तासांची मुभा देण्यात आलेली आहे. दूध डेअरी व दूध विक्रेत्यांना दिलेल्या या मुदतीचा गैरफायदा इतर दुकानदारही घेत आहेत. निर्बंधाच्या काळात आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या दुकानांच्या पाट्याच बदलविल्याचे चित्र दिसून येते. जीवनावश्यक वस्तूंची नावे टाकून इतर दुकाने सुरू ठेवण्यात येत आहेत. शीतपेयांच्या दुकानांसमोर दूध डेअरीच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. काही जनरल स्टोअर्स चालकांनी डेली निड्स, किराणा व भाजीपाला असे याठिकाणी मिळत असल्याचे बोर्ड आपल्या दुकानांसमोर लावले आहेत. पालिका व पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईपासून वाचण्याची वेगळी शक्कल दुकानदारांनी शोधून काढल्याचे चित्र दिसून येते. अशा दुकानांचा शाेध घेउन दुकानदरांवर कारवाई करण्याची गरज आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दररोज कारवाई सुरूच आहे. इतर दुकानदारांनी जर दुकानासमोर दूध डेअरीचे बोर्ड लावलेले असेल, तर त्यांच्याकडे दूध डेअरीचे शॉप ॲक्ट असणे गरजेचे आहे. शॉप ॲक्टवर नमूद बाबी नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. - गजानन लहासे, उपमुख्याधिकारी, नगर पालिका बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा