सामान्य रुग्णालयात कर्मचा-यांची हाणामारी

By Admin | Updated: June 6, 2015 00:46 IST2015-06-06T00:46:53+5:302015-06-06T00:46:53+5:30

बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रकार.

General Hospital Employees | सामान्य रुग्णालयात कर्मचा-यांची हाणामारी

सामान्य रुग्णालयात कर्मचा-यांची हाणामारी

बुलडाणा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांवरील वरिष्ठाचे नियंत्रण सुटले असून, शुक्रवारी एका कर्मचार्‍याने डॉक्टरांशी हुज्जत घातल्याने दोघेही हातापाईवर आले होते. विशेष म्हणजे हा प्रकार सकाळी रुग्णांच्या समोर झाल्याने दिवसभर याबाबत उलटसुलट चर्चा होती. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासन चांगलेच ढेपाळले आहे. डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे आहे त्या डॉक्टरांच्या माध्यमातून कामे करून घेणे वरिष्ठांना जिकरीचे झाले आहे. यातच वैद्यकीय अधिकार्‍यावर ताण पडत असल्याने कर्मचारी व अधिकार्‍यामध्ये बेबनाव निर्माण होत आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी आला. एका कर्मचार्‍याने डॉक्टराकडे रुग्ण नेला व तपासण्या करण्याचे सांगितले; मात्र डॉक्टरांनी नकार दिल्याने या दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. हा प्रकार येथे उपस्थित रुग्णांनी पाहिला. विशेष म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हिवाळे यांनी या दोघांनाही आपल्या कक्षात बोलावून समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र येथेही या अधिकारी व कर्मचार्‍यांनी वाद घातल्याचे समजते.

Web Title: General Hospital Employees