शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
7
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
8
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
9
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
10
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
11
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
12
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
13
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
14
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
15
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
16
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
17
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात गौरव कृषिरत्नांचा

By admin | Updated: May 28, 2014 01:24 IST

अकोला येथे ‘लोकमत कृषिरत्न पुरस्कार २0१४’ चे शानदार सोहळ्यात वितरण!

अकोला : आलेल्या संकटांचा सामना करीत, विपरीत परिस्थितीतही अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर नवीन प्रयोग करून यशस्वीरित्या शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे लोकमतने मंगळवारी कौतुक केले. वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील ३६ शेतकर्‍यांना  कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जगाचा पोशिंदा मानल्या जाणार्‍या शेतकर्‍याच्या वाट्याला कौतुकाचे शब्द कमी आणि दु:खच जास्त येते. विपरीत परिस्थितीत शेतकरी त्याचे काम करीत असतो. कशाचीही पर्वा न करता वर्षभर तो शेतात राबत असतो. त्याच्या घामातूनच धान्यरूपी मोती उगवत असतात. अनेक शेतकर्‍यांनी निराशा झटकून आणि विपरीत परिस्थितीवर मात करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्कृष्ट शेती केली. त्यांचे हे कार्य इतर शेतकर्‍यांसाठीदेखील प्रेरणादायी ठरले. या शेतकर्‍यांच्या कामाचे कौतुक लोकमतने मंगळवारी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. ठाकरे सभागृहात मंगळवारी वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील ३६ शेतकर्‍यांना ह्यकृषिरत्नह्ण पुरस्कार देण्यात आला. लोकमतच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व कृषी क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या धानुका अँग्रीटेक लिमिटेड या कंपनीने स्वीकारले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानुका अँग्रीटेक लिमिटेडचे जनरल मॅनेजर एच.एम. रावळ होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, तर प्रमुख अतिथी म्हणून महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एस.डी. वानखडे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. प्रमोद लहाळे, कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. विजय माहोरकर, अकोला-वाशिम जिल्हा कृषी व्यावसायिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले, सहाय्यक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल हेदेखील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषिरत्न पुरस्कार विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. रवी टाले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. मान्यवरांनी आपल्या भाषणातून लोकमतच्या स्तुत्य उपक्रमाचे आणि प्रयोगशील शेतकर्‍यांचे कौतुक केले. ३७ शेतकर्‍यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते ह्यकृषिरत्नह्ण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान नृत्यांगणा राधिका साठे यांच्या कथ्थक नृत्य मंदिरच्या चमुने गणेश वंदना व होळी नृत्य सादर केले. किशोर बळी यांनी एकपात्री विनोदी कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे संचालन राजेश शेगोकार यांनी केले, तर आभार विकल्प ठाकूर यांनी मानले.