खामगावातील हॉटेलात गॅस सिलींडर स्फोट; वृध्दासह दोन जण जखमी

By अनिल गवई | Updated: April 17, 2026 21:53 IST2026-04-17T21:52:34+5:302026-04-17T21:53:19+5:30

हॉटेलचे मोठे नुकसान, भीतीने बाजूच्या बिल्डींगमधील युवती खाली कोसळली

Gas cylinder explosion in hotel in Khamgaon; Two people including an elderly person injured | खामगावातील हॉटेलात गॅस सिलींडर स्फोट; वृध्दासह दोन जण जखमी

खामगावातील हॉटेलात गॅस सिलींडर स्फोट; वृध्दासह दोन जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील जलंब रोडवरील वाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता एका हॉटेलमध्ये गॅस सिलींडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत एक वृद्ध शिवणकाम कारागीर आणि शेजारच्या इमारतीतील एक युवती जखमी झाली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये एकापाठोपाठ तीन गॅस सिलींडरचा स्फोट झाला. या स्फोटात अरुण अनोकार (वय ७२), हे शिवणकाम करणारे कारागीर गंभीररीत्या भाजले. आग लागल्याच्या वेळी ते दुकानातील ग्राहकांचे कपडे आणण्यासाठी आत गेले होते. त्याचवेळी शेजारील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेली कादंबरी किरण आचार्य (वय १९) ही स्फोटाच्या धक्क्यामुळे खाली कोसळली. तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी दोघांनाही तत्काळ वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित हॉटेल अरुण कोलते यांच्या मालकीचे असल्याचे समजते. स्फोटामुळे हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून हिमांशू नाहर या युवकाची दुचाकी देखील आगीत जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण पवार, पीएसआय राजेश गोमासे, संतोष गायकवाड व राम धामोळे घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या दोन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

तसेच, भाजप मीडिया सेलचे सागर फुंडकर, तहसीलदार सुनिल पाटील व वीज वितरण तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title : खामगाँव होटल में गैस सिलेंडर विस्फोट, दो लोग घायल

Web Summary : खामगाँव के एक होटल में गैस सिलेंडर फटने से एक वृद्ध दर्जी और एक युवती घायल हो गए। दर्जी झुलस गया, जबकि युवती को चेहरे पर चोटें आईं। होटल को काफी नुकसान हुआ और एक मोटरसाइकिल जल गई।

Web Title : Gas Cylinder Explosion at Khamgaon Hotel Injures Two People

Web Summary : A gas cylinder explosion at a Khamgaon hotel injured an elderly tailor and a young woman. The tailor suffered burns, while the woman sustained facial injuries. The hotel suffered significant damage, and a motorcycle was destroyed.

टॅग्स :fireआग