शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत १९ लाखाचा दंड वसूल

By admin | Updated: June 12, 2014 20:51 IST

५ महिन्यात वाहतूक पोलिसांनी उपविभागात १९ लाख ८६ हजार ५00 रु. दंड वसूल केला आहे.

खामगाव : उपविभागामध्ये वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी चांगलीच मोहीम उघडली आहे. गत १ जानेवारी ते ३१ मे पर्यंत अशा ५ महिन्यात वाहतूक पोलिसांनी उपविभागात १९ लाख ८६ हजार ५00 रु. दंड वसूल केला आहे.
वाहतूक परवाना नसणे, वाहन परवाना, अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक करणे, गाडिची कागदपत्रे नसणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, भरधाव वाहन चालवणे, दारु पिऊन वाहन चालवणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केसेस करुन दंड वसुल केला. खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍या टॅक्सी, रिक्षा मधून अनेक वेळा अवैध वाहतूक केली जाते. वाहतूक परवान्यापेक्षा जास्त प्रवाशी बसवले जातात. चालकाच्या जवळ चार- पाच प्रवाशी बसवल्या जात असल्यामुळे त्या चालकाला गाडी चालवताही येत नाही. अशा परिस्थितीत अपघात होण्याचा धोका अनेक पटीने वाढलेला असतो. याकडे दुर्लक्ष करुन बिनधास्तपणे वाहतूक केली जात आहे.
याकडे पोलिसांनी लक्ष देऊन या वाहतूकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. मोटारसायकल स्वार कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता भरधाव गाड्या चालवतात. त्यामध्ये जीवाला धोका असून सुद्धा ते त्याकडे लक्ष देत नाही.
अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. आपला जीव धोक्यात टाकून ते इतरांचेही जीवन धोक्यात टाकतात. त्यामुळे बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.


** १४ हजार ९९0 केसेस
मागिल पाच महिन्यात १४ हजार ९९0 केसेस केल्या आहेत. यामध्ये अवैध प्रवासी वाहतूकीच्या ६९५ केसेस करुन ५ लाख ७२ हजार २00 रुपये तर १४ हजार २९५ केसेस बेशिस्तपणे वाहन चालविणे, गाडीची कागदपत्र नसणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंन करणार्‍यांवर केल्या आहेत. यामध्ये जवळपास १३ लाख ९९ हजार ३00 रुपये दंड वसूल केला आहे.