शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
3
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
5
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
6
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
7
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
8
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
9
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
10
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
11
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
12
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
13
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
14
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
15
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
16
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
17
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
18
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
19
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
20
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे आंदोलनात पहिले पाऊल

By admin | Updated: June 22, 2014 00:57 IST

रेल्वे भाडेवाढ : शेगाव तहसीलवर मोर्चा

शेगाव : भाजप सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ तर मालभाड्यात ६.५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ आज शनिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने रेल्वे स्थानकावर निषेध व्यक्त करुन तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. १0 वर्षानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांना सरकारविरोधी मोर्चा काढण्याची ही वेळ असल्याने या मोर्चात कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी मोठय़ा संख्येने सहभाग दर्शविला.
केंद्र सरकारने काल एका पत्रकार परिषदेत रेल्वेची भाडेवाढ जाहीर केली. या निर्णयाचा निषेध आणि भाडेवाढ त्वरित मागे घेण्याच्या मागणीसाठी आज शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात आणि पक्षनेते रामविजय बुरुंगले, तबस्सुम हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली शेगावातील रेल्वे स्थानकावर काँग्रेस पदाधिकार्‍यांचा भव्य मोर्चा धडकला. ह्यमोदी सरकार हाय.. हाय.. भाडेवाढ मागे झालीच पाहिजे, ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है.. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. निदर्शने करताना कार्यकर्त्यांच्या हाती मोदी सरकार विरोधी आणि भाडेवाढ मागे घेण्यासंदर्भात फलके होती. यानंतर काँग्रेसचा हा निषेध मोर्चा तहसीलवर धडकला.
याठिकाणी तहसीलदार डॉ.रामेश्‍वर पुरी यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर निवेदन सादर करण्यात आले.
केंद्र शासनाने बजेट सादर करण्यापूर्वीच रेल्वे भाड्यांमध्ये भरमसाठ वाढ करुन जनतेवर अन्याय केलेला असून, सदर भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा जिल्हाभरात तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.