शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीचा आगीत जळून मृत्यू

By admin | Updated: March 27, 2015 01:41 IST

बुलडाणा तालुक्यातील घटना.

बुलडाणा : तालुक्यातील ग्राम पिंपरखेड येथील सीमा सुरक्षा बलमध्ये कार्यरत २६ वर्षीय जवान आणि त्याची १९ वर्षीय पत्नी या दोघांचा राहत्या घरात आगीत जळून मृत्यू झाला. ही घटना २५ मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. पिंपरखेड येथील संदीप महादेव धनवटे हा सशस्त्र सीमा सुरक्षा बलात बिहार येथील किशनगंज येथे जवान म्हणून कार्यरत होता. चिखली तालुक्यातील आंधई गावातील रूपाली (१९) हिच्या सोबत सहा महिन्यांपूर्वी संदीपचा विवाह झाला होता. विवाहासाठी घेतलेल्या सुट्या संपल्यानंतर संदीप कर्तव्यावर परत गेला नाही, त्यामुळे सीमा सुरक्षा बलाने वारंट काढून बुलडाणा पोलिसांना पत्र देऊन संदीपला किशनगंज येथे हजर करण्याचे सांगितले. यानंतर बुलडाणा पोलीस दलाने संदीपला कर्तव्यावर हजर केले होते; मात्र १९ मार्च रोजी संदीप पुन्हा परत पिंपरखेड येथे पळून आला. या दरम्यान गावातील बर्‍याच मंडळीने त्याला कर्तव्यावर जाण्याचा सल्ला दिला; मात्र तो जाण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान, घटनेच्या दिवशी २५ मार्च रोजी संदीप दिवसभर गावातून फरार होता. रात्री १0 वाजता तो घरी परतला, तेव्हा पत्नी रुपाली आणि त्याची आई घरात झोपल्या होत्या. रुपालीला उठवून तो दुसर्‍या खोलीत घेऊन गेला. रात्री १२ वाजेच्या सुमारास गावातील एका व्यक्तीने त्यांच्या खोलीतून धूर निघताना पाहिले. दरम्यान, संदीप व रुपाली दोघेही आगीत होरपळल्याचे दिसल्यानंतर तत्काळ या घटनेची माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. यावेळी प्रभारी ठाणेदार निचल दल आपल्या पथकासह घटनास्थळी दखल झाले. तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलिसाच्या उपस्थितीत २६ मार्च रोजी दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दोघांचा मृत्यू आगीत होरपळून झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले. अधिक तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस करीत असल्याची माहिती प्रभारी पोलीस ठाणेदार निचल दल यांनी दिली.