विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 7, 2014 23:44 IST2014-06-07T23:20:47+5:302014-06-07T23:44:52+5:30

अलमपूर येथे ५ जून रोजी नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या

An FIR has been lodged against husband with husband in the marriage case | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा : तालुक्यातील अलमपूर येथे ५ जून रोजी नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्या घटना घडली होती. याप्रकरणी मृतकच्या भावाने आज पो.स्टे.ला दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मृतकच्या पतीसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पती व दिराला अटक केली आहे. याबाबत विकास शांताराम वाघ रा.चिखली घोडसगाव ता.मुक्ताईनगर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, बहीण मृतक जयश्री संभाजी डांगे (वय २२) रा.अलमपूर हिने विष प्राशन करून आत्महत्या केली. पती संभाजी सुधाकर डांगे, दिर महादेव सुधाकर डांगे व चुलत सासु शारदा प्रभाकर डांगे यांनी संगनमत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला व हुंड्यात राहिलेले २0 हजार रूपये आण असा तगादा लावला. त्यामुळे तिने विष प्राशन करून आत्महत्या केली, असे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी संभाजी सुधाकर डांगे, महादेव सुधाकर डांगे व शारदा प्रभाकर डांगे अशा तिघांविरूध्द कलम ४९८ अ, ३0४ ब, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करून संभाजी ड ांगे, महादेव डांगे यांना अटक केली आहे. याप्रकरणी तपास पीएसआय झोडगे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: An FIR has been lodged against husband with husband in the marriage case