शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
7
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
8
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
9
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
10
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
11
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
12
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
13
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
14
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
15
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
16
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
17
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मेहकर बायपासवरुन धावली वाहने

By admin | Updated: May 28, 2014 00:37 IST

कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी बायपासवरुन वाहनी धावली; मेहकरवासियांनी घेतला सुटकेचा निश्‍वास.

मेहकर : शहरातील रस्त्यांवर तासन -तास खोळंबलेल्या रहदारीला मार्गदेण्यासाठी गत तीन वर्षापुर्वी बायपासचे काम सुरू करण्यात आले होते. ते काम पूर्ण होऊन शिवसेनेने घेतलेल्या पुढाकाराने मंगळवारला नागरिकांच्या सेवेत एका छोटीखानी कार्यक्रमाने बायपास सुरु करण्यात आला. कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी या बायपासवरुन अखेर वाहनी धावली. त्यामुळे शहरवासियांनी शहरातील वाहतुकीपासून सुटकेचा निश्‍वास घेतला. औरंगाबाद नागपूर जाणारे सर्व वाहने शहरातुनच जात असल्याने वाहतूकीचा प्रश्न गंभीर रुप धारण करत होते. शहरातुन जाणार्‍या अवजड वाहणासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था म्हणुन शासनाच्यावतीने बायपासचे काम के.टी. कंस्ट्रक्शन इंदोर यांच्याकडे २0११ मध्ये सोपविण्यात आले होते. शासन करारानुसार के.टी.कंस्ट्रक्शनने वेळेच्या आत म्हणजे १७ जानेवारी २0१३ मध्येच बायपासचे काम पुर्ण केले. बायपासवरील रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र, काही तांत्रीक अडचणींमुळे तब्बल आठ महिने पुलाचे काम बंद राहिले. शिवसेनेच्यावतीने अनेक वेळ रास्तारोकोसह विविध आंदोलनेही करण्यात आले होते. आज सकाळी नागरिकांच्या सेवेत बायपास खुला झाला.