जलजन्य आजार पसरण्याची भीती

By Admin | Updated: July 25, 2015 01:18 IST2015-07-25T01:18:47+5:302015-07-25T01:18:47+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील पाणीनमूना दूषित पाण्यात थर्मोटॉव रेंट या जंतूंच्या प्रमाणात वाढ.

Fear of spreading waterborne illness | जलजन्य आजार पसरण्याची भीती

जलजन्य आजार पसरण्याची भीती

बुलडाणा : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्यामध्ये बाधित स्रोतांची संख्या व रासायनिक घटकांचे वाढलेले प्रमाण घातक असते. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत बुलडाणा जिल्ह्यातील पाणी दूषित असल्याचे उघड झाले आहे. या दूषित पाण्यात थर्मोटॉव रेंट या जंतूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने बुलडाण्यात जलजन्य आजाराची भीती निर्माण आहे. ग्रामीण स्तरावरील पाणी मोठय़ा प्रमाणात दूूषित आढळल्याने जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतील सर्व ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांतून एप्रिल, मे, जून महिन्यात ही पाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात प्रत्येकी ४00 स्रोतांचे नमुने तपासल्यानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये रोगजन्य जिवाणू बाधित स्रोतांची संख्या व रासायनिक घटकांचे प्रमाण तपासले गेले. याअंतर्गत जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतील १0५५ पाणी नमुने तपासण्यात आले होते. यात २0२ पाणी नमुने दूषित आढळून आले. या दूषित पाण्यात थर्मोटॉव रेंट या जंतूंच्या प्रमाणात वाढलेले आढळून आले. यामुळे जलजन्य आजाराची भीती वाढली आहे.

* पाण्यातील पाच घटकांची तपासणी

  थर्मोटॉव रेंट या साथीच्या रोगांना चालना देणार्‍या जिवाणूंचे जास्त प्रमाण आढळून आले आहे. यामुळे गॅस्ट्रो व इतर जलजन्य आजार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळांमार्फत पिण्याच्या पाण्या तील एचपी, सॉलिड, फ्लोराईड, नायट्रेट, आयर्न हे पाच घटक तपासले गेले आहेत.

Web Title: Fear of spreading waterborne illness