गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: August 18, 2015 01:30 IST2015-08-18T01:30:02+5:302015-08-18T01:30:02+5:30

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा कारणीभूत.

Farmer's suicide by taking a leap | गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या

गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या

बुलडाणा : जिल्ह्यातील साखळी बु. येथील एका शेतकर्‍याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून १६ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. येथील शेतकरी रामराव भावराव बोराडे यांच्याकडे साडेनऊ एकर शेती असून, सततच्या नापिकीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. यावर्षी त्यांनी शेतीसाठी सेंट्रल बँकेच्या येळगाव शाखेतून ६0 हजार रूपये आणि जिल्हा केंद्रीय सहकारी सोसायटीतून १0 हजार रूपये कर्ज घेतले होते; मात्र पावसाने दगा दिल्यामुळे ते हतबल झाले होते. या विवंचनेतून त्यांनी स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे पुतणे ङ्म्रीराम गोविंदराव बोराडे यांनी दिली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: Farmer's suicide by taking a leap