शेतकरी पुत्राची आत्महत्या

By Admin | Updated: January 8, 2017 02:17 IST2017-01-08T02:17:34+5:302017-01-08T02:17:34+5:30

तीन वर्षांपासूनच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या.

Farmer's son suicides | शेतकरी पुत्राची आत्महत्या

शेतकरी पुत्राची आत्महत्या

सुलतानपूर, दि. ७- येथील शेतकरी कुंडलिक नामदेव कांबळे यांचा पुत्र नारायण कुंडलिक कांबळे (वय ४२) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.
कुंडलिक कांबळे यांच्याकडे ७ एकर शेती असून, त्यांच्यावर येथील सेंट्रल बँकेचे ५0 हजार रुपये कर्ज आहे. या परिसरात मागील तीन वर्षांपासून नापिकी झाली असून, यावर्षी बर्‍यापैकी शेतमाल झाला असला, तरी त्याला भाव नाही. शेतात जातो असे सांगून नारायण घरातून निघाला व शेतातील गुरांच्या गोठय़ात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद गजानन कांबळे यांनी दिली. फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी १७४ प्रमाणे र्मग दाखल केला आहे. नारायण यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई- वडील असा आप्त परिवार आहे.

Web Title: Farmer's son suicides