शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
3
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
5
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
6
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
7
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
8
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
9
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
10
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
11
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
12
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
13
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
14
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
15
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
16
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
17
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
18
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
19
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
20
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
Daily Top 2Weekly Top 5

झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी अनुदान

By admin | Updated: June 22, 2014 01:14 IST

पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना : राज्यातील चार हजार १७४ ग्रामपंचायतींना संधी

हर्षनंदन वाघ / बुलडाणा
गावाच्या लोकसंख्येएवढी झाडे जिवंत ठेवणार्‍या ग्रामपंचायतींना पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत दरवर्षी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्या आधारे राज्यातील ४,१७४ ग्रामपंचायतींना, अनुदानासाठी दरवर्षी पात्र ठरण्याची संधी प्राप्त झाली आहे.
पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून, समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे ओळखून, ह्यइको व्हिलेजह्णची संकल्पना राबविण्यासाठी राज्य शासनाने पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना राज्यात सुरू केली आहे. योजनेच्या तिसर्‍या वर्षी एकूण ४,१७४ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या होत्या.
शासनाने २0१0-११ मध्ये सुरू केलेल्या पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत सतत तीन वर्ष विविध निकष पूर्ण करणार्‍या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारे निधी देण्यात येत आहे. राज्यातील एकूण २७,५00 ग्रामपंचायतीपैकी प्रथम वर्षी १६,४४३, व्दितीय वर्षी ९,२९0, तर तृतीय वर्षी ४,१७४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या व त्यांनी योजनेच्या अंतर्गत मिळणार्‍या विविध निधीचा लाभ घेतला; मात्र तिसर्‍या वर्षानंतर कोणत्याच प्रकारचा लाभ मिळत नसल्यामुळे अनेक ग्राम पंचायती या योजनेपासून दूर जात होत्या. त्यामुळे शासनाने तिसर्‍या वर्षाचे निकष पूर्ण करणार्‍या ग्राम पंचायतींना, निकषामध्ये सातत्य ठेवल्यास दरवर्षी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तिसर्‍या वर्षी निधी प्राप्त करणार्‍या राज्यातील ४,१७७ ग्रामपंचायतींना दरवर्षी निधी मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे.