शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानाच्या मदतीत पेरणीचाही खर्च निघेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:35 IST

सोयाबीनसाठी एका एकराला शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च आलेला आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानावर शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजारांची मदत शनिवारी जाहीर करण्यात आली. एका एकरामागे ३ हजार २०० रुपये याप्रमाणे ही मदत आहे. परंतू सोयाबीनसाठी एका एकराला शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च आलेला आहे. त्यामुळे नुकसानाच्या या मदतीत शेतीला लागलेल्या बियाण्याचाही खर्च निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकºयांवर आता अस्मानीनंतर सुलतानी संकट आले आहे.पांढरे सोने कापूस हद्दपार होऊन आता सोयाबीनचा भाग म्हणून जिल्ह्याला ओळखले जाते. पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक उत्पादन हे सोयाबीनचे होते. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकºयांची मदार ही सोयाबीन पिकावरच आहे. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५३५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. परंतू जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान केले. आहे. पैनगंगा नदी पात्राच्या परिसरातील अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या पुरात वाहून गेल्या. काही सोयाबीनच्या सुड्यांना बुरशी आली. तर अनेकांचे शेतात उभे असलेले सोयाबीन सडले. त्यामुळे या पावसाने मोठे नुकसान सोयाबीन पिकाचे केले आहे. या भागातील शेतकºयांचे संपूर्ण अर्थार्जन सोयाबीन पिकावर अवलंबुन आहे. परंतु सोयाबीनचे नुकसान झाल्याने या शेतकºयांच्या नजरा शासनाकडून मिळणाºया मदतीकडे होत्या. परंतू नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी शासनाने शनिवारी मदत जाहीर केल्यानंतर शेतकºयांची मोठी निराशा झाली. जाहीर झालेली ही मदती शेतकºयांना आतापर्यंत लागलेला खर्च भरून काढणारी सुद्धा नाही.फळबाग शेतकºयांची निराशाबुलडाणा जिल्ह्यात ८४७.६० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आलेली आहे. पश्चिम विदर्भात फळबागेचे सर्वाधिक क्षेत्र हे बुलडाणा जिल्ह्यात आहे. शेतकºयांनी एमआरईजीएस, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबागा घेतल्या आहेत. पावसाचा मोठा फटका फळबागेलाही बसला आहे. फळबागेला एकरी ७ हजार २०० रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. फलोत्पादन शेतकºयांची ही निराशाच आहे.

या मदतीतून पिकांना लागलेला खर्चही भरून निघत नाही. सोयाबीनच्या भरवश्यावर शेतकºयांचे वर्षभर घर चालते. परंतू यंदा सोयाबीनच शेतकºयांच्या हातातून गेली आहे. या मदतीमध्ये वाढ करण्याची गरज आहे. शेतकºयांसाठी आंदोलन करण्यात येईल.- नामदेवराव जाधव,शेतकरी संघटना, बुलडाणा.

सोयाबीनला आतापर्यंत लागलेला खर्च या मदतीतून निघत नाही. जाहीर झालेली ही तुटपुंजी मदत शेतकºयांना न परवडणारी आहे. एका एकराला किमान सरसकट २५ हजार रुपये मदत देऊन शेतकºयांना दिलासा देण्यात यावा.- गजानन पवार,शेतकरी,अंत्री दे., ता.मेहकर.

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी