शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
7
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
8
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
9
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
10
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
11
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
12
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
13
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
14
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
15
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
16
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
17
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

मृगाचा हत्ती, चित्राची म्हैस यंदा तारणार

By admin | Updated: May 28, 2014 00:38 IST

मशागत अंतिम टप्प्यात; ८ जूनला लागणार मृग नक्षत्र; घरच्या बियाण्यावर शेतकर्‍यांचा भर.

बुलडाणा: पावसाचा अंदाज नेहमीच पंचागकर्ते ठरवितात. याच अंदाजावर शेतकरी विश्‍वास ठेऊन शेतात पेरणी करतात. खरीप हंगामात या नक्षत्रात असलेले वाहन शेतकर्‍यांच्या जीवनात सुख-दु:खाचे चक्रव्यूह सुरू ठेवतात. यंदा मृग नक्षत्र हत्ती या वाहनापासून तर चित्राच्या म्हैस या वाहनापर्यंत समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला असून, भरघोस उत्पन्नाची आशा पल्लवीत झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शेतजमिनीची मशागत अंतिम टप्प्यात आहे. मागील चार वर्षांत अनेकदा पावसाने खरीप हंगामात दगा दिला आहे. कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार, याविषयी पंचांगकर्त्यांनी आपले अंदाज मांडले. शेतकर्‍यांनी या अंदाजाप्रमाणे शेतीची मशागत करून पेरणी केली. या पूर्वीच्या हंगामात अनेक वेळा अतवृष्टीने तर कधी अल्प पावसामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले. मागील वर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला. तर घरात सोयाबीन पीक येत असताना झालेल्या अतवृष्टीमुळे सोयाबीनला झाडावरच कोंब फुटून सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती. यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकर्‍यांनी जमिनीची मशागत पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांची मदार या खरीप हंगामाच्या उत्पादनावर असते. मृगाच्या पावसापासून हवामान खाते व पंचांगकर्त्यांचे अंदाज खरे ठरले तर यंदा अधिक उत्पादनाची शक्यता आहे.