शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून सुरू होणार विद्युत विकास

By admin | Updated: May 9, 2015 01:53 IST

बुलडाणा मतदार संघासाठी पथदश्री प्रकल्प; १00 गावात होणार ग्रामसभा.

बुलडाणा : वीज वितरण यंत्रणा व ग्रामीण भागातील सामान्य जनतेमध्ये नेहमीच समन्वयाचा अभाव असल्याने जनतेच्या तक्रारीचे निरसन होत नाही. त्यामुळे वीज कंपनीवर नागरिकांचा नेहमीच रोष असतो. ही दरी दूर करण्यासाठी आणि गावपातळीवर शेतकरी व सामान्य नागरिकांच्या विजेच्या संदर्भातील समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी लोकसहभागातून विद्युत विकास हा पायलट प्रोजेक्ट बुलडाणा मतदार संघात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात या प्रकल्पाकरिता ७ मेपासून ग्रामसभा घेतल्या जात असून याबाबत शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन काळात ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आ. स पकाळ यांनी ही संकल्पना मांडल्यानंतर शासनाने याला मंजुरात दिली. त्यानुसार बुलडाणा म तदार संघात १00 ग्रामसभेच्या माध्यमातून सर्व गावाची निलप्रत तयार होणार आहे. ७ मे पासून या पथदश्री कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येणार असून, या सभेला वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता स्वत: उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतील, तसेच कोणत्या गावात किती व कोणत्या ठिकाणी विद्युत ड.ीपी. बसवायची, याबाबत शेतकर्‍यांच्या सूचना ऐकून घेतील व त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाईल.