शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृउबाससाठी चुरशीचे मतदान

By admin | Updated: June 28, 2015 23:13 IST

९0 टक्केच्या वर मतदान; ४७ उमेदवारांच्या भाग्याचा होणार फैसला.

खामगाव (जि. बुलडाणा) : जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २८ जून रोजी चुरशीचे मतदान झाले. सर्वच मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ९0 च्या वर झाले. स्थानिक इंदिरा गांधी नगर परिषद माध्यमिक शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रावरील हाणामारीचा प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सोमवारी सकाळी मतमोजणी होणार असून, ४७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी २८ जून रोजी तालुक्यातील एकूण १२ मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामसेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, अडते, व्यापारी व हमाल मापारी मतदारसंघातून २९८७ पैकी एकूण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघामध्ये एकूण ६९९ पैकी ६९0, ग्रामपंचायत मतदारसंघात ७८८ पैकी ७६२, व्यापरी मतदारसंघात ७६७ पैकी ७२६, हमाल मापारी मतदारसंघात ७३३ पैकी ६७0 मतदारांनी मतदान केले. यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण प्रवर्गातून ७ उमेदवार निवडून द्यावयाचे असून, या प्रवर्गात १९ उमेदवार रिंग्ंणात होते. याच प्रवर्गातील महिला राखीव प्रवर्गात दोन जागांसाठी चार उमेदवार, इतर मागासवर्गीय एका जागेसाठी २ उमेदवार तर वि.जा. व भटक्या जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण प्रवर्गातील दोन जागांसाठी ७ उमेदवार, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी दोन, दुर्बल घटक प्रवर्गातील एका जागेसाठी दोन, अडते/व्यापारी मतदारसंघातील दोन जागांसाठी चार उमेदवार तर हमाल/ मापारी प्रवर्गातील एका जागेसाठी चार असे एकूण ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत भाराकाँ-भारिप बमसं प्रणित शेतकरी प्रगती पॅनलच्यावतीने माजी आमदार दिलीपकुमार सानंदाच्या नेतृत्वात १८ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे सर्मथन होते. तर भाजप पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व आ. भाऊसाहेब फुंडकर तथा आ. आकाश फुंडकर यांनी केले. त्यांना भारिप बमसं दुखावलेल्या गटासह, राष्ट्रवादीतील एका गटाचे सर्मथन होते. दोन्ही पॅनलच्यावतीने शक्ती पणाला लावण्यात आल्यामुळे चुरशीचे मतदान झाले.