शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे रुग्णसेवा व्हेंटीलेटरवर

By admin | Updated: June 12, 2014 22:18 IST

बुलडाणा जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत,

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत, मात्र याकडे आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात परिचारिकांची ५७, औषध निर्माण आधिकार्‍यांची ३, रुग्णसेवकांची ६0, वैद्यकीय आधिकार्‍यांची ५ पदे रिक्त आहेत. यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची देखभाल करण्यासाठी परिचारिका नाहीत. शस्त्रक्रिया विभागामध्ये रुग्णाला दाखल करणे, त्यांची ने-आण करण्यासाठी रुग्ण सेवकांची गरज आहे, मात्र ही अनेक पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम होताना दिसत आहे.
रुग्णांना चांगली सेवा पुरविली जावू शकत नाही. रिक्त पदांमुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे. कामावर असलेल्या रुग्णसेवकांना जास्तीचे काम करावे लागते. यामुळे ते कामावर लक्ष देऊ शकत नाही. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. शासन आरोग्य सेवेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करते मात्र, कर्मचारी संख्या कमी असल्याने आरोग्य सेवा पुरविण्याचा हेतू साध्य होत नाही.
पदे रिक्त असल्यामुळे कामावर असलेल्या परिचारिकांवर कामाचा ताण वाढत आहे. यामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.
औषध निर्माण आधिकार्‍यांची ३ पदे रिक्त आहेत. तर महत्वाची असलेली वैद्यकीय आधिकार्‍यांची ५ पदे रिक्त आहे. ग्रामीण भागात काम करण्यास आज कोणीच उत्सूक नसते. अधिकार्‍यांचीच पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांनी अडचणी कोणाला सांगायच्या हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. तर, आधिकारी नसल्याने इतर कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार सुरु असतो. शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेणारे रुग्ण कमकुवत आर्थिक परिस्थितीचे व ग्रामीण भागातील असतात. मात्र आज परिपूर्ण आरोग्य सुविधा मिळण्यापासून वंचित आहेत.
वातावरणाच्या बदलामुळे साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. यामुळे शासकीय रुग्णाल्यात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. ही पदे रिक्त असल्याने त्यांना लवकर उपचार मिळत नाही. यामध्ये रुग्ण दगावल्यास त्याची जबाबदारी कोणाची?असाही प्रश्न उपस्थित होतो.आरोग्यासारख्या महत्वाच्या विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आरोग्या यंत्राणा प्रभावित झाली आहे.याचा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.