अवकाळी पावसाची हजेरी

By Admin | Updated: April 30, 2017 02:41 IST2017-04-30T02:41:51+5:302017-04-30T02:41:51+5:30

लोणार तालुक्यातील अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Due to the sudden rainy season | अवकाळी पावसाची हजेरी

अवकाळी पावसाची हजेरी

लोणार : तालुक्यातील अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची उन्हाच्या उकाड्यापासून सुटका झाली. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना शनिवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने दिलासा मिळाला. दुपारी तीनपासूनच काळ्या ढगांनी आभाळ भरून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हवेत अधिकच उष्मा जाणवत होता. सायंकाळी ५.३0 वाजता विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. सुमारे दहा मिनिटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचले होते.

Web Title: Due to the sudden rainy season