शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे सावट!

By admin | Updated: June 16, 2014 00:49 IST

वीज खांब कोसळल्याने गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे.

सोनाळा : परिसरात झालेल्या वादळामुळे वीज खांब कोसळल्याने गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे सुमारे ४३५ हेक्टर बागायती क्षेत्रावर लागवड केलेल्या कपाशीच्या पिकाला पाणी देता येत नसल्याने अंकूर कोमेजत असून दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोनाळा व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे दीड तास सोसाट्याच्या वार्‍यासह वादळ झाले. या वादळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील झाडे कोळमडून पडली. तसेच विजेचे खांब व त्यावरील तार तुटल्याने सोनाळा भाग १ व २, पिंगळी जहांगीर, बोरखेड शिवारातील शेती पंपाला होणारा विद्युत पुरवठा बंद झाल्याने चारशे पासष्ठ हेक्टर बागायती शेती प्रभावीत झाले आहे. पेरलेल्या कपाशीच्या बिजवाईचे अंकुर कोमेजण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. नैसर्गिक वातावरणातील पावसावर अवलंबून न राहता व कपाशीचे भरघोस घेण्याकरिता दरवर्षी सोनाळा परिसरातील सोनाळा, सायखेड, पिंगळी, सगोडा, बोरखेड, बावनबीर शिवारातील शेतकरी वर्ग मृग नक्षत्रात बागायती कपाशीची पेरणी करतात. यावर्षी ही परिसरातील शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात चारशे पासष्ठ हेक्टर बागायती क्षेत्रावर पेरणी केली आहे. यामध्ये काही शेतकर्‍यांच्या बागायती मधील कपाशी बिजवाई जमिनीवर निघाली तर काहीने अंकुर बाहेर काढले आहेत. ११ जून रोजी वादळाने थैमान घातले होते. परिसरातील शेतातील खांब तुटले तर काहीचे तारही तुटून पडले आहेत. यामुळे शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने बागायती कपाशीला पाणी देणे बंद केले आहे. गेली चार दिवस उलटून गेली आहेत तरीही वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा सुरु केला नाही. वादळी पावसाचा काही प्रमाणात जमिनीत ओलावा टिकून आहे तर वरुन सूर्यप्रकाश आग ओकत असल्याने पेरलेल्या बागायती कपाशीच्या बिजवाईचे तीन-तेरा वाजत असल्याचे चित्र सर्वदूर परिसरात आहे. बर्‍याच शेतकरीवर्गाने महागाईची बिजवाई पेरलेली असल्याने चांगले उत्पादन घेण्याची स्वप्ने धुळीत मिळत आहेत.