लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार

By Admin | Updated: April 30, 2017 14:14 IST2017-04-30T14:14:21+5:302017-04-30T14:14:21+5:30

फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रभारी वैद्यकीय अधिकाºयाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Doctor's nurse rape by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार

संग्रामपूर : लग्नाचे आमिष दाखवून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याने वेळोवेळी बलात्कार केला, मात्र आता लग्नास नकार देत आहे, अशी फिर्याद संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत अधिपरिचारिकेने तामगाव पोलिस स्टेशनला दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी पदाचा प्रभार जळगाव जामोद येथील डॉक्टर दीपक कृष्णराव केदार यांच्याकडे आहे. दरम्यान डॉ.दीपक केदार यांनी लग्नाचे आमिष दाखवित बलात्कार केला. मात्र आता लग्नास नकार देत आहे, अशी फिर्याद वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका ३४ वर्षीय अधिपरिचारिकेने शनिवारी तामगाव पोलिस स्टेशनला दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक कृष्णराव केदार याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Doctor's nurse rape by showing lover of marriage