जिल्ह्यात ४५ जण पॉझिटिव्ह, ३४ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:35+5:302021-07-08T04:23:35+5:30

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील पाच, खामगाव सहा, शेगाव सहा, देऊळगाव राजा एक, चिखली १४, नांदुरा सात, लोणार एक, मोताळा ...

In the district, 45 people tested positive and 34 people beat Corona | जिल्ह्यात ४५ जण पॉझिटिव्ह, ३४ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात ४५ जण पॉझिटिव्ह, ३४ जणांची कोरोनावर मात

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील पाच, खामगाव सहा, शेगाव सहा, देऊळगाव राजा एक, चिखली १४, नांदुरा सात, लोणार एक, मोताळा एक, जळगाव जामोद एक, सिंदखेड राजा तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. दरम्यान, मलकापूर, मेहकर आणि संग्रामपूर तालुक्यातील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही. दुसरीकडे ३४ जणांनी बुधवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ५ लाख ९० हजार ८४६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८६ हजार १९८ कोरोनाबाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

--१३३० अहवालांची प्रतीक्षा--

तपासणीसाठी घेण्यात आलेल्या संदिग्धांच्या स्वॅबपैकी १ हजार ३३० जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ८७ हजार ३८ झाली आहे. यापैकी १७६ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ६६४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.

Web Title: In the district, 45 people tested positive and 34 people beat Corona