शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बुरशीयुक्त काळ्या गव्हाचे वितरण

By admin | Updated: August 31, 2015 01:26 IST

नांदुरा येथील रेशन दुकानांतून गोरगरिबांच्या जिवाशी खेळ.

नांदुरा (जि. बुलडाणा) : सणासुदीच्या काळात तालुक्यातील रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांंना ओल्या बुरशीयुक्त काळ्या रंगाच्या गव्हाचे वितरण होत असून, सदर काळा गहू हा दुर्गंंधीयुक्त व आरोग्यास धोकादायक असल्याची ओरड लाभार्थी करत असतानाही रेशनप्रणालीतून तालुका पुरवठा विभाग सदर गव्हाचे वितरण करीत असल्याने लाभार्थी संतप्त झाले आहेत. वरिष्ठांनी याबाबत या काळ्या बुरशीयुक्त ओल्या गव्हाचे नमुने तपासून याचे वितरण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रेशन प्रणालीमार्फत जुलै व ऑगस्टच्या धान्य साठय़ाचे वितरण रेशन दुकानातून होत आहे. यामध्ये वितरित केल्या जाणारा गहू हा ओला, बुरशीयुक्त व काळ्या रंगाचा असल्याने सदर निकृष्ट गहू आरोग्यास घातक असतानाही त्याचे वितरण बिनधास्तपणे सुरू आहे. याबाबत काही रेशन लाभार्थ्यांंनी रेशन परवानाधारक दुकानदारास विचारणा केली असता आलेला गहू अशाच पद्धतीचा आहे. तुम्हाला हवा असल्या न्या, असे सांगून सदर दुकानदार हा आरोग्यास घातक गहू वितरित करीत आहे. आरोग्यास घातक धान्य पुरवठा अधिकार्‍यांनी वितरित करायला नको होते; मात्र त्यांनी तालुक्यातील बहुतांश रेशन दुकानदारांना सदर गव्हाचे वितरण केले आहे. काही दुकानदारांनी याबाबत ओरड केली असता त्यांना योग्य समज दिल्याने त्यांनीही आता या गव्हाचे वितरण सुरू केले आहे. याबाबत शासकीय धान्य गोदामास भेट दिली असता सर्वत्र गोदामात धान्य विखुरलेले पाहण्यास मिळाले. एका भागात चांगला गहू लाल शिक्क्यातील पोत्यात साठवलेला तर ओला गहू काळ्या शिक्क्यातील लागलेल्या पोत्यात साठवलेला होता. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी या निकृष्ट गव्हाचे नमुने तपासून याचे वितरण थांबवावे व चांगल्या गव्हाचा पुरवठा लाभार्थ्यांंना करावा, अशी मागणी लाभार्थ्यांंंकडून होत आहे. तसेच काळ्या ओल्या बुरशीयुक्त गव्हाचे वितरण करणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.