शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा नगराध्यक्षांना अपात्र करा!

By admin | Updated: January 5, 2017 02:05 IST

नियम डावलून स्वीकृत सदस्याची नियुक्ती केल्याची काँग्रेसची तक्रार.

बुलडाणा, दि. ४- बुलडाणा नगरपालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ व जिल्हाधिकार्‍यांकडे नोंदणी केलेल्या गटाने सुचविलेल्या नावांना डावलून स्वीकृत सदस्यांची निवड करीत बुलडाणा नगराध्यक्षांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचे अध्यक्षपद रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.बुलडाणा नगरपालिकेत बुधवारी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्यांची निवड करण्याचे अधिकार नगराध्यक्षांना असतात. बुलडाणा नगरपालिकेत शिवसेनेचे दहा, काँग्रेसचे आठ, भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, तर भारिपचे दोन नगरसेवक आहेत. नगरपालिकेतील गटांची जिल्हाधिकार्‍यांकडे नोंदणी करण्यात आली आहे. या गटानुसार शिवसेनेचा एक, काँग्रेसचा एक व भाजपचा एक स्वीकृत सदस्य होणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराला डावलून भारिपच्या उमेदवाराला स्वीकृत सदस्य करण्यात आले. काँग्रेसने नगरपालिकेत नियुक्त केलेले गटनेते आकाश विजय दळवी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले, की ३ जानेवारी रोजी त्यांनी विनोद रमेश बेंडवाल यांची शिफारस म्हणून अर्ज व नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयाने अध्यक्षांना सदर यादी पाठविली. नगरपालिकेत आठ सदस्य असलेल्या काँग्रेसचे माझी गटनेता म्हणून निवड केली आहे. ४ जानेवारी रोजी स्वीकृत सदस्याची निवड करण्याकरिता सभा बोलाविण्यात आली होती. शासनाच्या परिपत्रकानुसार मी सुचविलेल्या नेत्याची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करणे अनिवार्य होते. मात्र, तसे न होता पीठासिन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी माझा अर्जच न घेता सभा संपली असे सांगून नगराध्यक्ष सभा सोडून गेले. तसेच पीठासिन अधिकार्‍यांनी चुकीचे संख्याबळ दर्शवून अन्य व्यक्तीची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली. त्यामुळे पीठासिन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून गटनेता परिपत्रकानुसार गटनेत्याने नाव निर्देशित केलेल्या व्यक्तीची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली नाही. त्यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी आकाश दळवी यांनी केली आहे.गटनेत्याने दिलेले नाव ग्राह्य धरण्याचा नियम स्वीकृत सदस्याची निवड करीत असताना महाराष्ट्र नगर पारिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश २0१६ नुसार नगरपालिकेतील संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांची निवड करायला हवी. तसेच गटनेता जे नाव देईल, त्याच व्यक्तीची निवड करण्याचे अध्यादेशात नमूद आहे. एखाद्या पक्षाच्या नगरसेवकांनी आम्हाला उमेदवार मान्य नाही, असे लिहून दिल्यावर त्या पक्षाच्या उमेदवाराला डावलणे अयोग्य आहे. नगरसेवक फुटले असतील, तर होणार कारवाई स्वीकृत सदस्य निवडणुकीत काँग्रेसच्या गटनेत्याने सुचविलेल्या नावाला विरोध करीत नगराध्यक्षांकडे काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी लेखी दिले असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद राखोंडे यांनी सांगितले.