शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

संचालक, व्यापाऱ्यांनी मिळून केला भ्रष्टाचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 00:24 IST

शेगावच्या नाफेड केंद्रावर हजारो क्विंटलचा तूर घोटाळा उघडकीस

शेगाव: शेगाव येथील शासनाच्या तूर खरेदी केंद्रावर अनागोंदी कारभार सुरू असल्याची सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची ओरड होती. यात एका शेतकऱ्याने माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या केंद्र्रांवर खरेदी-विक्री संस्था आणि बाजार समितीच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही संचालक आणि व्यापाऱ्यांनी आपल्याकडे अल्प शेती असताना शेकडो क्विंटल तूर नाफेड केंद्रावर मोजल्याचे दिसून आले आहे. बुलडाणा जिल्हा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांचा जिल्हा असल्याने व याच जिल्ह्यात एवढा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने शासन कुठल्या प्रकारची कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल ‘जैसे थे’ ठेवून व्यापाऱ्यांचा व बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या तुरीचे मोजमाप होत असल्याने मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी आवाज उठविला होता. त्यामध्ये बाजार समितीचे सचिव यांनी केलेल्या चौकशीमध्ये तूर खरेदी केंद्र्रावरील निरीक्षक अ.ए. शेगोकार यांनी आपण पदाधिकारी व संचालकांच्या दबावाखाली हा गैरप्रकार केल्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्याने माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत येथील संचालक आणि काही व्यापाऱ्यांनी शेकडो क्विंटल तूर मोजली आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना चुकाऱ्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागत असताना घोटाळेबाजांना मात्र दुसऱ्याच दिवशी धनादेशही मिळाले आहे.शेगाव बाजार समितीचे विद्यमान संचालक श्रीधर पाटील यांच्यासह काही संचालकांनी आपल्या आई आणि भावांच्या नावे शेकडो क्विंटल तूर मोजली आहे. एका माजी सभापतींच्या मुलाकडे फक्त २ एकर शेती असताना १०० क्विंटल तूर नाफेड केंद्रावर विकली आहे. तर त्यांच्याकडे १० एकरापेक्षा कमी शेत असताना २०० क्विंटलपेक्षा जास्त तूर दिल्याचे निष्पन्न झाले आहे. सुधाकर ढोले असे हा घोटाळा बाहेर काढणाऱ्या व्यक्तीचे नाव असून सर्व दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घोटाळ्यात आणखी काही संचालक, नाफेडचे अधिकारी, व्यापारी, खरेदी-विक्री व बाजार समितीचे काही कर्मचारी अडकणार असल्याची माहिती असून, लवकरच या घोटाळे बाजाची नावे समोर येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री ना. फुंडकर सध्या विदेश दौऱ्यावर असून, ते भारतात परत आल्यानंतरच कारवाई होणार असल्याचे समजते. खविसं, नाफेड, बाजार समिती कर्मचाऱ्यावरही टांगती तलवार कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत टोकण दिलेले नसतांना खरेदी विक्री मार्फत तूरीचे मोजमाप करण्यात आले आहेत. शिवाय जमीनीचे क्षेत्रफळ नसतांना तुरीचे मोजमाप करण्यात आले. प्रति एकर ५ क्विंटलपेक्षा जास्त तूर खरेदी करण्याचे आदेश नसतांना त्यापेक्षा जास्त माप घेण्यात आले आहे. याकडे खविसं, नाफेड आणि बाजार समितीच्या काही कर्मचाऱ्यानीही हाथ धुवून घेतल्याने आता त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. मार्केटच्या अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाराची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुधाकर ढोले यांनी केली आहे. शेकडो क्विंटल तूर घोटाळा उघडकीस आलेला असल्याने त्यावर नियमानुसार फौजदारी कारवाई करण्याबाबत चे पत्र सहायक निबंधक शेगाव यांना मंगळवारी दिले आहे. - गोविंदराव मिरगे, कृउबास सभापती, शेगाव.