धुपेश्‍वरला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्गाचा दर्जा

By Admin | Updated: May 16, 2014 00:05 IST2014-05-15T23:31:56+5:302014-05-16T00:05:42+5:30

धुपेश्‍वर संस्थानला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित विकास कामे पूर्णत्वास जातील अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.

Dhupeshwar's status as 'B' class of pilgrimage center | धुपेश्‍वरला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्गाचा दर्जा

धुपेश्‍वरला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्गाचा दर्जा

मलकापूर : खान्देश, मध्यप्रदेश व विदर्भासह परिसरातील जनतेचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र धुपेश्‍वर संस्थान हरसोडाला तीर्थक्षेत्राचा बह्ण वर्गाचा दर्जा मिळाल्याने आता येथे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली विकास कामे पूर्णत्वास जातील अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. सदर संस्थानला ह्यबह्ण वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती तथा राकाँ जिल्हा सरचिटणीस संतोष रायपुरे यांनी प्रयत्न केले. १५ मे रोजी राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंतराव पाटील यांच्या मुंबईस्थित दालनामध्ये तीर्थक्षेत्राच्या राज्य निकष समितीच्या सभेत श्री क्षेत्र धुपेश्‍वर संस्थान हरसोडा या ह्यकह्ण वर्गीय तीर्थक्षेत्रास ह्यबह्ण वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी संतोषराव रायपुरे यांनी केलेल्या पाठपुराव्यांमुळे यश येऊन या संस्थानला ह्यबह्ण वर्गाच्या दर्जाची मान्यता देण्यात आली. या सभेला ग्रामविकास प्रधान सचिव संधू, उपसचिव शिंदे, ग्रामविकास विभागाच्या श्रीमती विशाखा यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. ह्यबह्ण वर्गाचा दर्जा मिळाल्यामुळे संस्थानच्या विकासासाठी २ कोटी रुपयांचा निधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून, प्रलंबित घाटाचे काम, पथदिवे, भक्तनिवास, स्नानगृह व स्वच्छता गृह आदी सुविधा या निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास जाऊ शकतात.

Web Title: Dhupeshwar's status as 'B' class of pilgrimage center