शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: October 7, 2015 23:29 IST

मासरुळ लघु पाटबंधारे तलावाच्या प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा.

सज्रेराव देशमुख /धाड ( जि. बुलडाणा) : सिंचन प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत करून मासरुळ लघु पाटबंधारे तलावाची दहा वर्षांपूर्वी उंची वाढवण्यात आली. या प्रकल्पात बाधित मालमत्तेचा सर्व्हे करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांकडून यानंतर कुठल्याही पुनर्वसन अनुदानाची मागणी करणार नाही, अथवा न्यायालयात दाद मागणार नाही. अशा आशयाचे शपथपत्र लिहून घेतले, तरीही अद्याप बाधित शेतकर्‍यांना त्यांच्या भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्याने नाराज शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर साधारणत: वीस वर्षांपूर्वी मासरुळ पद्मावती प्रकल्पाचे काम झाले असून, परिसराचा चेहरा सुजलाम बनवण्यामध्ये या धरणाच्या सिंचनाचा सिंहाचा वाटा आहे. प्रकल्पाची उपयुक्तता लक्षात घेता २00५-0६ मध्ये शेतकरी वर्गामधून कोणतीही मागणी नसताना प्रशासकीय पातळीवर भिंत उंचीकरणाचे काम हाती घेण्यात आले. जवळपास २0 कोटी रुपये तत्कालीन स्थितीत खर्च करुन १0 फूट भिंतीची उंची वाढवण्यात आली. या वाढीव क्षेत्रात पाण्याखाली जाणार्‍या संभाव्य जमिनी, विहिरी, झाडे आणि इतर मालमत्तेचा सर्व्हे करण्यात आला. जमीन मालकांची संमतीपत्रे, शपथपत्रे भरुन घेण्यात आली; मात्र कोणताही मोबदला शेतकर्‍यांना देण्यात आला नाही. मराठवाड्यातील पद्मावती येथील शेतकर्‍यांनी जोपर्यंत पूर्ण मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत सांडव्याचे काम करू देणार नाही, या मागणीसाठी मोर्चा काढून काम बंद पाडले. त्यामुळे सांडव्याची उंची पूर्वीइतकीच कायम ठेवण्यात आली. दरम्यानच्या काळात प्रकल्प खर्चाची किंमत दुपटी-तिपटीने वाढली असून, भूसंपादनाच्या नवीन धोरणाप्रमाणे शासकीय दरपत्रकाच्या पाचपट रक्कम प्रकल्पग्रस्तांना वितरीत करणे अपेक्षित आहे. प्रकल्पबाधितांचे लाखो रुपये लालफितशाहीच्या कचाट्यात अडकले आहे. त्यामुळे भूसंपादन मोबदला मिळावा, या उद्देशाने परिसरातील बाधित शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणेकडे उंबरठे झिजवत आहे. तत्काळ मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याची तयारी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.