शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवेचा बोजवारा!

By admin | Updated: September 2, 2015 23:52 IST

संग्रामपूर तालुक्यातील आरोग्यकेंद्रात सुविधाचा अभाव; १६ पदे रिक्त.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तालुक्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक यंत्रसामग्री तसेच तज्ज्ञांची पदे भरण्यात आली नसल्याने रूग्णांवर थातूरमातूर उपचार होत आहेत तर अनेक रुग्णांना रेफर करीत असल्याने नाहक भुर्दंड सोसावा लागत असून, वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शासनाचा आरोग्य सेवेचा दावा फोल ठरत आहे. संग्रामपूर तालुक्यामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून संग्रामपूर, सोनाळा, पातुर्डा, वानखेड या आरोग्य केंद्राचा समावेश आहे. या आरोग्य केंद्रात एकूण १६ पदे रिक्त आहेत. तसेच जे कर्मचारी उपकेंद्रावर कार्यरत आहेत ते मुख्यालयी राहत नसल्यामुळे रूग्ण उपचार घेण्यासाठी आल्यानंतर कर्मचारी नसल्याने खासगी दवाखान्यामध्ये उपचार घ्यावा लागतो. उपकेंद्रावर ज्या दिवशी कॅम्प आहे फक्त त्याचदिवशी उपस्थित राहतात. तालुक्यामध्ये शिवणी, हड्यामहल, सायखेड, पिंगळी, सावण, शेंबा ही गावे आदिवासी भागात येत असल्यामुळे येथील अवस्था तर बिकट आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोमवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अपघातामध्ये जखमी झालेल्या रूग्णावर उपचार करण्यासाठी सोयी सुविधा नसल्याचे स्वीकारले. रुग्णालयांमध्ये एक्सरे मशीन, तसेच रूग्णांची रक्त, लघवी तपासण्याची सुविधा नाही. प्रसूतीवेळी शिजरची व्यवस्था नसल्याकारणाने रूग्णांना शेगाव येथे रेफर करावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.