शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:37 IST

डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांची ‘एलायझा’ तपासणी केल्यावर ती ‘निगेटीव्ह’ येत आहे.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलमध्ये रुग्णांची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांची ‘एलायझा’ तपासणी केल्यावर ती ‘निगेटीव्ह’ येत आहे. परंतु याची लक्षणे व धोका तेवढाच गंभीर असल्याने डॉक्टर असे रुग्ण आपल्या देखरेखीत ठेवत आहे. या रुग्णांमध्ये लहान मुलांसोबत तरुणांची संख्या मोठी आहे.उपराजधानीत गेल्या पाच वर्षांत डासांच्या दंशाने मलेरियाच्या तुलनेत डेंग्यूचा फैलाव झपाट्याने झाला. या रोगामुळे नागपुरातील जनता चांगलीच त्रस्त झाल्याचे चित्र आहे. शहरात २०१२ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. २३७ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४०वर पोहचली. यात दोन जणांना प्राण गमवावे लागले. २०१५ मध्ये २३० रुग्ण आढळून आले होते. २०१६ मध्ये १९५ रुग्णांना डेंग्यू तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर या वर्षी आतापर्यंत १३७ रुग्ण आढळून आले. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभाग जनजागृती सोबतच घराघरांची तपासणी करून डेंग्यूच्या अळ्या आढळून येणारी कुलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, फुलदाणी हे आपल्यासमक्ष रिकामी करून किंवा त्यात कीटकनाशक औषध फवारणी किंवा गप्पी मासे सोडून उपाययोजना करीत आहे. यामुळे काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. परंतु प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास डेंग्यूचा प्रकोप कमी करणे शक्य असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.तूर्तास शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी डेंग्यू रोगाची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या संख्येत दिसत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.डेंग्यूसदृश आजाराकडे दुर्लक्ष करू नकामेयो रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉ. दीपक मडावी यांनी सांगितले, सध्या रुग्णालयात तापाचे रुग्ण वाढले आहे. यात डेंग्यूची लक्षणे असलेली परंतु डेंग्यू नसलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यामुळे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप कमी होत नसेल तर पुन्हा डॉक्टरांना भेटावे, असेही ते म्हणाले.