अल्पसंख्याक समाजाला घरकुल देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:34 IST2021-04-11T04:34:17+5:302021-04-11T04:34:17+5:30

मेहकर : तालुक्यातील अजनी बुद्रुक येथील अल्पसंख्यांक समाजाला घरकुलसह इतर योजनांचे लाभ देण्यात यावेत, अशी मागणी अल्पसंख्यांक समाजाच्यावतीने पंचायत ...

Demand for housing for the minority community | अल्पसंख्याक समाजाला घरकुल देण्याची मागणी

अल्पसंख्याक समाजाला घरकुल देण्याची मागणी

मेहकर : तालुक्यातील अजनी बुद्रुक येथील अल्पसंख्यांक समाजाला घरकुलसह इतर योजनांचे लाभ देण्यात यावेत, अशी मागणी अल्पसंख्यांक समाजाच्यावतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अफरोज अली यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अजनी बुद्रुक या गावात अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. मात्र या समाजाच्या विविध विकास कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत गरजू, गरीब, अल्पसंख्यांक समाजातील लोकांना घरकुल योजनेमार्फत घर दिले जाते. मात्र या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांना हेतूपुरस्सर डावलण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या अल्पसंख्यांक समाजातील लोकांना तत्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर अफरोज अली, शेख सोहेल अतार, रहमान अतार, अश्फाक अली, अतुल देशमुख, जुबेर अतार, कौसर अली, शेख महंमद, शेख कादिर, जुबेर तांबोळी यांच्यासह अनेक लोकांच्या सह्या आहेत.

ओळी : निवेदन देताना अल्पसंख्यांक समाजातील मान्यवर.

Web Title: Demand for housing for the minority community