रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू

By Admin | Updated: January 7, 2017 03:00 IST2017-01-07T03:00:37+5:302017-01-07T03:00:37+5:30

मोबाइल फोनवर बोलत रेल्वेरुळ ओंलाडणे बितले जिवावर.

Death of the young man after coming under the railway | रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू

रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू

नांदुरा, दि. ६- मोबाइल फोनवर बोलत रेल्वेरुळ ओंलाडत असताना भरधाव दुरांतो एक्सप्रेसची धडक बसुन ३८ वर्षाचा तरूण ठार झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री रेल्वेगेटजवळ घडली. शिवपालसिंग जगतपालसिंग गायकवाड असे मृतकाचे नाव आहे.
मृतक शिवपालसिंग हा रात्री १२.३0 वाजताचे सुमारास लोहमार्ग ओलांडत असताना मोबाईलवर बोलत होता. याचवेळी सुसाट वेगात येणार्‍या दुरांतो एक्सप्रेसचा त्याला आवाज न आल्याने या गाडीची धडक बसून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Death of the young man after coming under the railway