शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

By admin | Updated: June 14, 2014 23:45 IST

वीज पडून येथील ग्रामपंचायत सदस्य बाबूसिंग डोंगरसिंग चांदा यांचा जागीच मृत्यू झाला.

चांडोळ : आज अचानक वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या दरम्यान वीज पडून येथील ग्रामपंचायत सदस्य बाबूसिंग डोंगरसिंग चांदा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी ६.३0 वाजेच्या सुमारास चांडोळ येथे त्यांच्या घरापुढे घडली. ग्राम चांडोळ येथे आज सायंकाळी पावसाचे वातावरण तयार होऊन वादळी वार्‍यासह पाऊस पडला. या दरम्यान येथील ग्रा.पं.सदस्य बाबूसिंग डोंगरसिंग चांदा(वय ४२) हे आपल्या घरासमोर असणार्‍या गाठय़ात जनावरांना बांधण्याकरता बाहेर आले. यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. कुटुंबातील लोकांनी त्यांना तत्काळ गावातील डॉक्टरकडे नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. आज चांडोळ आणि परिसरात एक तास मुसळधार पाऊस झाला. यात वीज पडून ग्रा.पं.सदस्य चांदा यांचा मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. मृतक बाबूसिंग चांदा यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी, पत्नी, आई असा आप्तपरिवार आहे. गावातील समाजकारण आणि राजकारणात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या अपघातातील मृत्यूमुळे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. बुलडाणा तालुक्यातील ग्रामीण भागात आज काही ठिकाणी वादळीवार्‍यासह तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे काही घरावरील टिनपत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.