सिंदखेडराजा : तालुक्यातील स्टेट बँक शाखा साखरखेर्डा येथे विविध मागण्यांसाठी शिवदास रिंढे यांचे उपोषण सुरू असून, २१ जून रोजी काही शेतकर्यांनी स्टेट बँकेच्या दारात ह्यडफडे बजाओह्ण आंदोलन केले.
भारतीय स्टेट बँकेच्या गलथान कारभारात तत्काळ सुधारणा करण्यात यावी, यासह अन्य १0 मागण्यांसाठी सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे यांनी २0 जूनपासून उपोषणास सुरुवात केली आहे.
त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यात येत नसल्याने तसेच विभागीय व्यवस्थापकालाही उपोषणकर्त्यांना भेटायला वेळ नसल्याने शनिवारला दुसर्या दिवशीही शिवदास रिंढे यांचे उपोषण सुरू होते.
शिवदास रिंढे यांच्या उपोषण मंडपाला भारिप -बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश गवई यांनी आज भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, शेतकरी व ग्राहकांनी साखरखेर्डा स्टेट बँकेच्या मुख्य दारात ह्यडफडे बाजाओह्ण आंदोलन करुन स्टेट बँकेच्या गलथान कारभारावर रोष व्यक्त करण्यात आला.
स्टेट बँकेच्या दारात ‘डफडे बजाओ’ आंदोलन
By admin | Updated: June 22, 2014 00:57 IST
सिंदखेडराजा तालुक्यातील स्टेट बँक शाखा साखरखेर्डा येथे विविध मागण्यांसाठी 'डफडे बजाओ’ आंदोलन
स्टेट बँकेच्या दारात ‘डफडे बजाओ’ आंदोलन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}