शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक कायद्याविषयी ग्राहक अनभिज्ञ

By admin | Updated: December 24, 2014 00:12 IST

ग्राहक दिन विशेष : बुलडाणा जिल्ह्यात २४ वर्षांत केवळ ६ हजार तक्रारी.

नीलेश शहाकार / बुलडाणा दैनंदिन जीवनात वस्तू वा सेवा खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक न्याय मंचाची स्थापना करण्यात आली आहे. तथापि, ग्राहक मंचाकडे न्याय मागणार्‍यांची संख्या मात्र वाढू शकली नाही. गेल्या २४ वर्षांंत बुलडाणा जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे केवळ ६ हजार ६८६ तक्रारी दाखल झाल्या. बाजारातून वस्तू किंवा सेवा घेताना बर्‍याच वेळा ग्राहकांना फसव्या जाहिराती, जास्त किमती, निकृष्ट दर्जा तसेच असमाधानकारक, अकार्यक्षम सेवा यामुळे आर्थिक नुकसान व मनस्ताप सोसावा लागतो. ही पिळवणूक टाळण्यासाठी तक्रारी, अडी-अडचणी योग्य त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत. वैयक्तिक पातळीवर न्याय मिळवा या उद्देशातून बुलडाणा जिल्ह्यात १९९0 ला जिल्हा ग्राहक न्याय मंचाची स्थापना करण्यात आली.गेल्या २४ वर्षांत बुलडाणा जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे ६ हजार ६८६ ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यापैकी ६ हजार ३२९ प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर सध्या ३५७ प्रकरणांचा निपटारा करणे बाकी आहे. शिवाय ग्राहक मंचाने दिलेल्या निकालावर ३२१ अवमान याचिका दाखल करण्यात आल्या. यात २0४ प्रकरणे निकाली काढण्यात काढण्यात आले. तर ११७ प्रकरणे प्रलंबित आहे.जिल्ह्याची लोकसंख्या १0 लाखांच्या वर आहे; मात्र तरीही जिल्ह्यातील ग्राहक आपल्या हक्कासाठी तक्रार करण्यास लोक पुढे येत नाहीत, हे स्पष्ट होत आहे. पैसे घेऊन जो आपल्या सेवा देतो अथवा वस्तू देतो त्या प्रत्येक व्यक्ती अथवा संस्थेच्या विरुद्ध फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार करू शकतो. यासाठी आपल्या हक्काबाबत ग्राहकांमध्ये जागृती असणे आवश्यक असल्याचे जिल्हा ग्राहक मंचाचे माहिती अधिकारी टी.एम. नाईक यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.