शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेगावला पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: August 18, 2014 23:45 IST

सलग सुट्यांमुळे शहर झाले पॅक

शेगाव: स्वातंत्र्यदिन, शनिवार अर्धा दिवस सुटी, रविवारची हक्काची सुटी आणि सोमवारी पारशी नववर्षदिनाची सुटी या सलग सुट्यांमुळे शेगाव शहर पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. सुट्यांच्या पृष्ठभूमीवर हॉटेल्स आणि दुकानेही पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.सलग सुट्या आल्याने पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची शहरात तुडुंब गर्दी झाली आहे. स्वातंत्र्यदिन, शनिवार, रविवार व पतेती या सुट्या जोडून आल्याने, पर्यटकांची मोठी वर्दळ या शहरात झाली आहे. संतनगरी शेगाव हे प्रतिपंढरपूर मानल्या जाते याशिवाय आध्यात्म आणि विज्ञानाच्या धर्तीवर या ठिकाणी उभारण्यात आलेले मनोहारी उद्यान आनंद सागर आज संपूर्ण देशवासीयांचे लक्ष केंद्रित करीत आहे. यामुळे या शहरात सुट्या घालविण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद यासह मोठमोठय़ा शहरातून पर्यटक शेगावकडे आकर्षित होत असतात. श्री संत गजानन महाराजांचे समाधी दर्शन या शिवाय पर्यटन ही दोन्ही कामे एकाच शहरात होत असल्याने या शहराला पर्यटकांनी पसंती दिली आहे. मागील दोन दिवसांपासून शहर वाहनांनी गजबजलेले असून, सर्व रस्त्यांच्या बाजूला वाहने उभी असल्याचे दिसत आहे. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने वाहनांसाठी नो-एंट्री केली आहे. पर्यटकांच्या वाढत्या गाड्यांच्या संख्येने शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. गर्दीने वाहन कोंडीचे प्रश्न निर्माण होत आहेत. पोलिस यंत्रणाही तत्पर राहून ही कोंडी काढण्यासाठी विविध उपाय शोधत आहेत; परंतु ते तोकडे पडताना दिसत आहेत. नजरेलाही साठविता न येणारे, उत्कृष्ट कलाकृतीच्या अजोड कारागिरीने मन थक्क करणारे व सर्वधर्मसमभाव जपणारे शेगावचे आनंद सागर या आध्यात्मिक व मनोहारी उद्यानाला या वर्षी आतापर्यंत एक कोटीच्यावर भाविक व पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. या आकड्यांवरुन मागील ८ वर्षात पर्यटकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.