Crowd attack on candidate's house at Deulghat | देऊळघाट येथे उमेदवाराच्या घरावर जमावाचा हल्ला

देऊळघाट येथे उमेदवाराच्या घरावर जमावाचा हल्ला

बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका उमेदवाराच्या घरावर १०० ते १५० जमावाने हल्ला करत मारहाण केली. तसेच गाड्यांची तोडफोड केली आहे. ही घटना बुलडाणा शहराला लागूनच असलेल्या देऊळघाट येथे १५ जाेनवारी राेजी रात्री घडली. या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण असून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
देऊळघाट येथील ग्रामपंचायतची एकूण १७ जागासाठी शुक्रवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली व शांततेत पार पडली. सायंकाळी मतदान आटोपल्यानंतर एका गटाचे काही उमेदवार व कार्यकर्ते मोमीनपुरा येथे वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार व माजी सरपंच मुश्ताक अहमद यांच्या घरी बसून चर्चा करत होते. त्याच वेळी विरोधी गटातील शंभर ते दीडशे कार्यकर्ता व नातेवाईक हातात लाठ्याकाठ्या घेऊन पोहोचले. त्यांनी मुश्ताक अहमद यांच्या घरावर दगडफेक करत शिवीगाळ केली व हल्ला चढविला.या मारहाणीत सईद खान हा युवक गंभीर जखमी झाला आहे. तसेच हल्ले खोरानी घराबाहेर उभे असलेल्या तीन दुचाकी व खुर्च्यांची सुद्धा तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच   उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार सारंग नवलकर आरसीपीचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच जखमी सईद खान याला उपचारार्थ दाखल केले.

Web Title: Crowd attack on candidate's house at Deulghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.