आत्महत्येप्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा

By Admin | Updated: May 31, 2014 23:55 IST2014-05-31T23:39:00+5:302014-05-31T23:55:21+5:30

पैश्याची मागणीवरून छळातून विवाहितेची आत्महत्या; पित्याच्या फिर्यादीवरून चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल.

Crime against four people in the case of suicide | आत्महत्येप्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा

आत्महत्येप्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा

मोताळा : पैश्याची मागणीवरून छळ झाल्यानेच मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद मृतक विवाहितेच्या पित्याने दिल्यावरून चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोताळा वार्ड क्रमांक ६ मधील सौ.रश्मिता निलेश पारसकर या विवाहितेने २५ मे रोजी रात्री विहिरीत आत्महत्या केली होती. मात्र विवाहितेचे वडिल वामन भुसारे रा.उमरपाडा जि.सुरत यांनी यांनी सासरच्या विरूद्ध फिर्याद दिली. यावरून पती निलेश पारस्कर, सासरा लहु पारस्कर, सासू निर्मला पारस्कर व लताबाई पारस्कर या चार जाणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against four people in the case of suicide