विषबाधेमुळे गायी व गोर्‍हे दगावले

By Admin | Updated: June 7, 2014 00:18 IST2014-06-07T00:02:52+5:302014-06-07T00:18:18+5:30

देऊळगाव राजा शहरातील संजयनगर भागातील घटना : दीड लाखाचे नुकसान

Cows and sheep are buried due to poisoning | विषबाधेमुळे गायी व गोर्‍हे दगावले

विषबाधेमुळे गायी व गोर्‍हे दगावले

देऊळगाव राजा : शहरातील संजयनगर भागामध्ये बायपासनजीक पाच गायींचा मृत्यू झाल्याची घटना ६ जून रोजी उघडकीस आली. यामध्ये विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. तर सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याने नुकसानभरपाई संबंधितांना मिळावी, अशी मागणी दत्ता काळे यांनी केली आहे.
देऊळगाव राजा शहरातील संजयनगर भागामध्ये बायपास रस्त्यानजीक ६ जून रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान पाच गायी मृतावस्थेत आढळून आल्या. यामध्ये तीन गायींचा व दोन गोर्‍हय़ांचा समावेश आहे. सकाळी प्रा त:विधीसाठी जाताना रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत पडलेल्या या गायी पाहून या गायींचे पशुपालक हजर झाले. यामध्ये देविदास पवार यांचा एक गोर्‍हा व दोन गायी मृत्युमुखी पडल्या, तर अशोक यट्ठोकर यांची एक गाय व एक गोर्‍हा मृत्युमुखी पडला. याबाबत संबंधित गायींनी काहीतरी विषारी खाद्य खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय विभागाकडून व्यक्त करण्यात आला. सदर घटनेची माहिती मिळ ताच देऊळगाव राजा पोलिस प्रदीप गुंजकर यांनी पशुवैद्यकीय अधिकारी एस.बी. पवार तथा डी.वाय. निकम यांच्याशी संपर्क साधून सदर गायींचे शवविच्छेदन करून घेतले. दरम्यान, तहसीलदार बुटले यांनी पशू मालकांना योग्य चौकशी करून शासनाकडून मदत मिळवून देण्यात येईल, असे सांगितले, तर दत्ता काळे यांनी पशू मालकांना शासनाने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Cows and sheep are buried due to poisoning