शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By admin | Updated: May 1, 2017 23:53 IST

बुलडाणा : केशवनगरातील ठेकेदार मोहम्मद अफजल मो. नजीर यांचा औरंगाबाद येथे "स्वाइन फ्लू"ने "एमआयटी" औरंगाबाद येथे उपचारादरम्यान ३० एप्रिल रोजी मृत्यू झाला.

बुलडाणा : येथील केशवनगरातील प्रसिद्ध ठेकेदार मोहम्मद अफजल मो. नजीर यांचा औरंगाबाद येथे स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने एमआयटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपचारादरम्यान ३० एप्रिल रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर सायंकाळी उशिरा दफनविधी करण्यात आला. बुलडाणा शहरातील केशवनगर परिसरात हनुमान मंदिराजवळील रहिवासी असलेले ठेकेदार मोहम्मद अफजल मो. नजीर (वय ६९) यांना टायफाईट झाल्यामुळे बुलडाणा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये १९ एप्रिल रोजी भरती करण्यात आले होते. मात्र, तीन दिवस उपचार केल्यानंतरही प्रकृती खालावत असल्यामुळे तसेच स्वाइन फ्लू या आजाराचे संशयित म्हणून खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना व्हेंटीलेटर सुविधेसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे ठरविले. मात्र, बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटीलेटरची सुविधा नसल्यामुळे शेवटी मोहम्मद अफजल यांना औरंगाबाद येथील एमआयटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. याठिकाणी २२ एप्रिल रोजी भरती केल्यानंतर त्यांच्या विविध चाचण्या घेऊन उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, २४ एप्रिल रोजी मोहम्मद अफजल यांना स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, ३० एप्रिल रोजी खोकला व कपमधून रक्त पडल्यानंतर आॅक्सिजनची कमी पडू लागली. दरम्यान, त्यांचा सकाळी ११.३० वाजता मृत्यू झाला. त्यांच्यावर संध्याकाळी उशिरा बुलडाणा येथे दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, असा आप्त परिवार आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक गरीब रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र, त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. लाखो रुपये खर्च होणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटीलेटरची सुविधा नसल्यामुळे वडिलांना स्वाइन फ्लू संसर्गजन्य आजार झाल्यानंतर त्वरित उपचार मिळू शकला नाही, अशी खंत मृतक मोहम्मद अफजल यांचा मुलगा मुन्ना मो. अफजल यांनी व्यक्त केली.