रेल्वे स्टेशनवर काँग्रेसने केले कीर्तन

By Admin | Updated: July 18, 2015 02:08 IST2015-07-18T02:08:51+5:302015-07-18T02:08:51+5:30

विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसची भाडेवाढ रद्द करण्यासाठी आंदोलन.

Congress banat keertan at railway station | रेल्वे स्टेशनवर काँग्रेसने केले कीर्तन

रेल्वे स्टेशनवर काँग्रेसने केले कीर्तन

खामगाव : खामगाव येथील स्टेशन परिसरात १७ जुलै रोजी श्री विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसची भाडेवाढ रद्द करण्यासाठी गांधीगिरी व शांततेच्या मार्गाने भजन, कीर्तन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस ठेवणार्‍या शेतकरी, वारकरी विठ्ठल भक्तांच्या श्रद्धेवर घाला घालण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. श्री विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसची करण्यात आलेली भाडेवाढ त्वरित रद्द करण्यात यावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी दिला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अंभोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अलकाताई खंडारे, नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष टाले, पंजाबरावदादा देशमुख, न.प. उपाध्यक्ष वैभव डवरे, माजी जि.प. अध्यक्ष वर्षाताई वनारे, पं.स. सभापती कुसुमताई तायडे, काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक मुळे, माजी नगराध्यक्ष सरस्वतीताई खासने, हभप विलास महाराज वाघमारे, देवीदास महाराज टापरे, पुंडलिक महाराज ठाकरे, देवीदास महाराज हजारे, रमेश महाराज पारधी, नामदेव महाराज, रामदास महाराज, सोपान महाराज, अनंत महाराज, दिनकर महाराज मार्के, पुंडलिक महाराज यांची उपस्थिती होती.

Web Title: Congress banat keertan at railway station