शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक गोळा करणे ‘त्याच्या’ उपजीविकेचे साधन

By admin | Updated: May 16, 2014 00:05 IST

एका २५ वर्षीय युवकाने बेरोजगारीवर मात करत प्लास्टिकच्या टाकाऊ पिशव्या कारखान्यात विकण्याचा आगळावेगळा उद्योग सुरू करून त्यालाच आपल्या उपजीविकेचे साधन बनविले आहे.

लोणार : एका २५ वर्षीय युवकाने बेरोजगारीवर मात करत प्लास्टिकच्या टाकाऊ पिशव्या बाजारपेठेतून विकत घेऊन त्या कारखान्यात विकण्याचा आगळावेगळा उद्योग सुरू करून त्यालाच आपल्या उपजीविकेचे साधन बनविले आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. कापडी पिशव्या हद्दपार झाल्याने विविध प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होऊ लागला आहे. मग त्यामध्ये किराणा दुकान, औषधीचे दुकान, कापड दुकान, हार्डवेअर, स्टेशनरी, हॉटेल किंवा भाजीपाला यासारख्या व्यावसायिकांचे प्लास्टिक पिशवी एक अविभाज्य अंगच बनले आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरामुळे अनेक शहरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये शहरातील सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्यांमध्ये प्लास्टिक पिशव्या अडकल्यामुळे मुंबईत हाहाकार माजला होता. त्यावरून महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणण्याचा प्रयत्नदेखील केला; परंतु याच प्लास्टिक पिशव्यांचा आजही बंदी असताना राजरोसपणे वापर होत आहे. त्यातून अनेक बेरोजगार युवकांच्या हाताला काम देऊन पोटाची खळगी भागविण्यासाठी या प्लास्टिक पिशव्या सहाय्यभूत ठरत आहेत. उत्तर प्रदेशातील उमरीयागंज येथील नियाजखान हा युवक आपल्या इतर भावंडासह बुलडाणा, जळगाव, मलकापूर, जालना, परभणी, लोणार, मेहकर, चिखली, देऊळगावराजा, मालेगाव, रिसोड, वाशिम यासारख्या मोठमोठय़ा शहरातील बाजारपेठेतून प्लास्टिकच्या टाकाऊ पिशव्या २२ रुपये किलो दराने खरेदी करतो. यामधून नियाजखान हा महिन्याकाठी जवळपास ५0 हजार रुपये कमाई करीत आहे.