शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस

By admin | Updated: January 2, 2015 00:40 IST

गारपिटीचाही तडाखा : खरिपापाठोपाठ रब्बीही धोक्यात.

बुलडाणा : नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेल्या गारांसह पावसाने १ जानेवारीच्या दुपारपर्यंंंत दमदार हजेरी लावली. आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्‍यांना रब्बी पिकापासून असलेली आशाही संपली. दुष्काळात तेरावा महिना, अशीच स्थिती या अवकाळी पावसामुळे झाली असून, जिल्हाभरात कमालीचा गारठा निर्माण झाला असून, सकाळपर्यंंत तब्बल ४३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.मेहकर, सिंदेखडराजा, लोणार, शेगाव, खामगावातही पावसाने जोरदार हजेरी लावली. देऊळगावमही परिसरात वादळी वारा तसेच गारांचा पाऊस झाला. ३१ डिसेंबरच्या रात्रभर सुरू असलेला पाऊस १ जानेवारीला दुपारी १२ वाजेपर्यंंंत सुरूच होता. या पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये हरभरा, तूर, कपासी, ज्वारी, गहू, कांदा, मका तसेच डिग्रस येथे काही प्रमाणात द्राक्ष बागाचे मोठे नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्याला फटकासंग्रामपूर तालुक्यातील वकाणा, रूधाना, काकोडा, बोडखा, पळशी, संग्रामपूर शिवारात झालेल्या गारपीटमुळे कांदा पीक उद्ध्वस्त झाले आहे, तर काकोडा, वकाणा गावामध्ये लिंबुच्या आकाराएवढी गार पडल्याने घरावरील कवेलु फुटले व ताडपत्री फाटल्या आहेत. वकाणा येथील गणेशराव खिरोडकार यांनी दिलेल्या माहितीनुसार गावात ३१ डिसेंबरच्या रात्री हवा, पाऊस व गारांमुळे कांद्याच्या पिकासह भाजीपाला मातीमोल झाला आहे. कांद्याच्या वाफ्यात पाणी साचून पात गारीने झोडपली.काकोडा येथील शत्रुघ्न मारखैर यांनी तहसील कार्यालयाकडे नुकसानीबाबत अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये गावातील कांदा, गहू, हरभरा व घरांवरील छतांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. गारांची संख्या व आकार पाहता बोरीच्या झाडांची बोरेही पुर्णत: गळून पडली आहेत. काकोडा गावात तर घरामध्ये गारांचा खच साचला होता. लगातार तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.*धाड भागात २८ हजार हेक्टरवर पेरणीक्षेत्र धोक्यातगेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसासोबत ३१ डिसेंबर रोजी धाड भागात गारांचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले आहे. धाड, वरुड, सोयगाव, जामठी व चांडोळ परिसरात बोराएवढी गारपीट झाल्याने गहू, हरभरा, सूर्यफूल, कांदा, मका व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची तहसीलदार दीपक बाजड यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी या पथकाने पाहणी केली असून, आर्थिक परिस्थितीने दबलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदतीची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.