चौक नामकरण व सौंदर्यीकरणाचे ठराव पारीत

By Admin | Updated: June 1, 2017 14:37 IST2017-06-01T14:37:44+5:302017-06-01T14:37:44+5:30

नामकरण करण्याचे ठराव चिखली नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतघेण्यात आले आहेत.

Chowk nomenclature and beautification | चौक नामकरण व सौंदर्यीकरणाचे ठराव पारीत

चौक नामकरण व सौंदर्यीकरणाचे ठराव पारीत

चिखली : शहरातील स्व.राजीव गांधी मार्केट (बाबु लॉज चौक) परिसराचे
सौंदर्यीकरण व मिनार उभारणे तसेच प्रभाग १ मधील पॉवर हाऊस चौकास सैलानी
बाबा चौक असे नामकरण करण्याचे ठराव चिखली नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत
घेण्यात आले आहेत.
नेहमी गजबलेला व विविध शासकीय कार्यालयाचा परिसर, हिंदु-मुस्लीम
देवस्थाने आणि आठवडी बाजाराचा परिसर असलेल्या स्व.राजीव गांधी मार्केट
(बाबुलॉज चौक) या परिसराचा विकास व सौंदर्यीकरणासह हा भाग मुस्लीमबहुल
असल्याने येथे मिनार उभारण्याचा ठराव नगरसेविका रेवती कुळकर्णी यांनी
मांडला होता तर यास ममता बाहेती यांनी अनुमोदन दिले होते. हा ठराव
सर्वानुमते पारीत झाला असून यासाठी जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनअंतर्गत
अथवा अल्पसंख्यांक निधी अंतर्गत मंजुरातीसाठी प्रस्ताव करणे व त्याच्या
मंजुरीनंतर बांधकामासाठी आर्कीटेक्चरची नियुक्ती व प्लान आणि
इस्टीमेटसाठी अडीच टक्के पर्यंत शुल्क देण्यास मंजुरी देण्याबाबत व
येणाऱ्या खर्चास तसेच प्रशासकीय व वित्तीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
तर प्रभाग क्रमांक १ मधील पॉवर हाऊस जवळील चौकातून लाखो भाविकांचे
श्रध्दास्थान सैलानी बाबांचा दर्गाहकडे रस्ता जात असल्याने सदर चौकास
सैलानी बाबा चौक असे नाकरण करण्याचा ठराव नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी
मांडला असता त्यास न.प.उपाध्यक्षा वजीरा बी शे.अनिस यांनी अनुमोदन
दिल्यानंतर सभागृहात हा ठराव देखील सर्वानुमते पारीत झाला आहे. (तालुका
प्रतिनिधी)

Web Title: Chowk nomenclature and beautification