आंबा खायला देतो म्हणत चिमुकलीवर केला अत्याचार, नराधम ५५ वर्षांचा तर पीडिता १६ महिन्यांची
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:37 IST2025-08-06T12:36:40+5:302025-08-06T12:37:22+5:30
आंबा खायला देतो या भूलथापेने आरोपीने चिमुरडीला आपल्या घरी नेले. काही वेळातच चिमुरडीचा रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने तिला जवळ घेतले. तेव्हा हा प्रकार लक्षात आला आणि तिची आई हादरून गेली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

आंबा खायला देतो म्हणत चिमुकलीवर केला अत्याचार, नराधम ५५ वर्षांचा तर पीडिता १६ महिन्यांची
जळगाव जामोद (जि. बुलढाणा): जळगाव जामोद पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात ५५ वर्षीय नराधमाने १६ महिन्यांच्या एका चिमुरडीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवारी, सकाळी १०:३० ते ११ वाजताच्या दरम्यान घडली.
आंबा खायला देतो या भूलथापेने आरोपीने चिमुरडीला आपल्या घरी नेले. काही वेळातच चिमुरडीचा रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने तिला जवळ घेतले. तेव्हा हा प्रकार लक्षात आला आणि तिची आई हादरून गेली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
संघटना आक्रमक
ही घटना केवळ एका मुलीवरचा अत्याचार नसून, संपूर्ण समाजाच्या अंतःकरणावर आघात आहे. या घटनेवरून सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून, माणुसकीची राखरांगोळी करणाऱ्या या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.