आमदारांनी गाजविली मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

By Admin | Updated: December 20, 2014 00:20 IST2014-12-20T00:20:14+5:302014-12-20T00:20:14+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील आमदार विकासप्रश्नावर आक्रमक.

Chief Minister's review meeting of MLAs | आमदारांनी गाजविली मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

आमदारांनी गाजविली मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

बुलडाणा: विधिमंडळ अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या जिल्हा आढावा बैठकीत सिंचन, खामगाव-जालना रस्ता, खडकपूर्णा प्रकल्प, जिगाव प्रकल्पासोबतच भूसंपादनास पुनर्वसनाचे मुद्दे आमदारांनी उपस्थित केल्याने ही बैठक गाजली.
या मुद्यांचा गंभिर्याने विचार करीत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय देत या निर्णयाबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
नागपूर विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात बुलडाणा जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली,
यावेळी आमदार भाऊसाहेब फुंडकर, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ.संजय रायमुलकर, हर्षवर्धन सपकाळ, प्रा. शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव अजय मेहता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, अपर जिल्हाधिकारी चिंतामण जोशी, पोलीस अधीक्षक श्याम दिगावकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना देण्यासोबतच प्रकल्पाचे भूसंपादन आणि पुनर्वसनास प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

Web Title: Chief Minister's review meeting of MLAs