स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द

By Admin | Updated: September 4, 2015 23:58 IST2015-09-04T23:58:06+5:302015-09-04T23:58:06+5:30

डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Cheap grain shop license cancellation | स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द

स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द

मेहकर (जि. बुलडाणा) : तालुक्यातील बेलगाव येथील शासकीय स्वस्त धान्य दुकान व केरोसिन विक्रीचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी मंगळवारी रद्द केला. बेलगाव येथील स्वस्त धान्य दुकान व केरोसीन विक्रीच्या परवान्यावर संबंधिताने काळाबाजार चालविला होता. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी, डोणगावचे ठाणेदार, तहसीलदार, अन्नपुरवठा निरीक्षक यांना बेलगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार डी.आर. वानखेडे यांच्या दुकानातील रेशनचा माल काळाबाजारात नेत असताना आढळून आले. त्यामुळे डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात तहसीलदार निर्भय जैन आणि अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी सतीश काळे यांनी डी.आर. वानखेडे यांच्या स्वस्त धान्य दुकान व केरोसिन विक्रीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला होता. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी तपासणी करून डी.आर. वानखेडे यांचा स्वस्त धान्य दुकान व केरोसिन विक्रीचा परवाना १ सप्टेंबरला रद्द केला. इसवी येथील ग.बा. काळे व सेवा सहकारी संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Web Title: Cheap grain shop license cancellation