शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
3
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
4
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
5
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
6
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
7
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
8
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
9
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
10
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
11
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
12
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
13
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
14
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
15
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
16
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
17
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
18
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
19
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
20
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
Daily Top 2Weekly Top 5

परिसर अभ्यास पाठय़पुस्तकामध्ये होणार बदल

By admin | Updated: June 7, 2014 00:28 IST

बालभारतीची नवनिर्मिती : तिसरी व चौथीचा परिसर अभ्यास आता नव्या रुपात

ब्रह्मनंद जाधव/ मेहकर
इयत्ता तिसरी व चौथीसाठी असलेल्या परिसर अभ्यासाच्या हस्तपुस्तिकेत बदल करण्यात आला असून, त्याचे रूपांतर बालभारतीने पाठय़पुस्तकात केले आहे. जून २0१४-१५ या शैक्षणिक सत्रापासून तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास नव्या रूपात आभ्यासायला मिळणार आहे.
इयत्ता तिसरी व चौथीसाठी परिसर अभ्यास यापूर्वी हस्तपुस्तिकेच्या माध्यमातून होता. त्यामध्ये प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २0१२ च्या आराखड्यानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. इयत्ता तिसरी व चौथीसाठी महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मीती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे यांनी परिसर अभ्यास भाग एक व दोनच्या पाठय़पुस्तकाची निर्मिती केली आहे. सदर पुस्तक जून २0१४-१५ या शैक्षणिक सत्रापासून कोणत्याही माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये अभ्यासले जाणार आहे. अभ्यासक्रम पुनर्रचनेप्रमाणे परिसर अभ्यास या विषयाचे दोन भाग करण्यात आले आहेत. भाग एकमध्ये भूगोल, सामान्य विज्ञान आणि नागरिकशास्त्र हे पूर्वीचे अभ्यासक्रम रचनेतील विषय अंतभरुत आहेत. तर भाग दोनमध्ये इतिहास हा विषय अं तभरुत करण्यात आला आहे. अध्ययनाचे ओझे कमी करणे हा उद्देश समोर ठेवून सदर पाठय़पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. या पाठय़पुस्तक निर्मितीमध्ये अभ्यासक्रम व पाठय़पुस्तक मंडळाच्या विविध विषय समि त्यांच्या कार्य गटांनी काम केले आहे. परिसर अभ्यास पाठय़पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ प्लास्टिक कोटेड आहे. तसेच त्यावरील चित्रे आकाशाला गवसणी घालावी अशी प्रेरणादायी, रंगीत व बोलकी आहेत. पाठय़पुस् तकाच्या अंतरंगात तिन्ही विषय मिळून साधारणत: १९ ते २१ अशा पाठय़रचना असून, अभ्यासक्रम चार प्रमुख क्षेत्रात विभागण्यात आला आहे. त्यामध्ये मी आणि माझी ओळख, शरीराची ओळख आणि आपले आरोग्य, आपल्या गरजा, माझा परिसर आणि आपले पर्यावरण आदी क्षेत्राची व्याप्ती आहे.
पाठय़पुस्तकात प्रत्येक कृतीसाठी भरपूर चित्रे व विविध मुद्यांसाठी विविध चिन्हे वापरण्यात आली आहेत. ज्ञान रचना एकात्मिक पद्धतीने विषय मांडणी, कृती व आनंद यातून शिक्षण एकंदरीत ह्यपाठांतराचे ओझे कमीह्ण या अनुषंगाने पाठय़पुस्तकाची निर्मिती बालभारतीने केली आहे. पाठय़पुस्तकामध्ये सोपा व कमी मजकूर विशेष चौकटी, रंगीत कृतीयुक्त नकाशे, सोपे स्वाध्याय, उपक्रम, मूल्ये, गाभाभूत घटक यांचा समावेश करण्यात आला आहे.

*मोळा येथील शिक्षकाने केले समीक्षण
मेहकर तालुक्यातील मोळा येथील शिक्षक गजानन पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक मंडळ पुणे येथे परिसर अभ्यास कार्यगटात पाठय़ पुस्तकाचे समिक्षण केले आहे. त्यांनी या पूर्वीही वेळोवेळी पाठय़पुस्तकाचे लेखन व समिक्षण केले आहे.